येहळेगाव तुकाराम येथील घटना
आखाडा बाळापूर/हिंगोली (Maratha reservation) : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील नेतृत्वाखाली राज्यभर अनेक महिन्यापासून आंदोलन व पाठपुरावा सुरु आहे. मराठा समाज आंदोलनात हजारो समाज बांधव सहभागी झाले आहेत. समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आजपर्यंत अनेक बांधवांनी आत्महत्या (Youth suicide) केलेल्या आहेत कळमनुरी तालुक्यातच सहा आत्महत्या आजपर्यंत झालेल्या आहेत.28 जुलै रोजी रात्री येहळेगाव तुकाराम येथे आणखी एका मराठा समाजबांधवाने आरक्षणासाठी आत्महत्या केली.
सोमवारी 29 जुलै रोजी मयत मतदेहाच आखाडा बाळापूर ग्रामीण रूग्णालयात (Akhara Balapur Hospital) शवविच्छेदन करण्यात आले .दुपारी सदर प्रकरणी अकस्मात मुत्यू दाखल करण्यात आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार (Maratha reservation) कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथील राजु शेषराव काळे वय 43 वर्षे यांनी रविवारी रात्री नउ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन (Youth suicide) आत्महत्या केली.
यातील मयत हा मागील काही दिवसापासून सुरु आसलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होउन, कुटुंबातील लोकांना नेहमी म्हणायचा की, आरक्षणामुळे मला शिकुन सुद्धा कोणतीही नोकरी लागली नाही. आपल्या समाजातील मुलांना सुद्धा आरक्षणामुळे नोकऱ्या मिळत नाहीत, असे नेहमी म्हणून सतत मराठा आरक्षण (Maratha reservation) विचारात राहून मयत याने त्याच्या राहत्या घरी बैठकीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आशा आशयाची कुंडलीक देवराव काळे फिर्यादीवरून आकस्मात मुत्यू नोंद करण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, बिटप्रमुख शेख अन्सार , शिवाजी पवार यांनी भेट दिली.