आखाडा बाळापूर/हिंगोली (Maratha Samaj reservation) : कळमनुरी तालुक्यात मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या (Youth suicide) झाली आहे. सदर प्रकरणी आज आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात अकस्मात मुत्यू दाखल करण्यात आला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बु येथील गोविंद जनार्दन खराटे वय 30वर्षे यांनी (Maratha Samaj reservation) मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही म्हणून सतत तणावात राहून 1ऑक्टोबर पहाटे तिन वाजता शेतात जाउन कोणतेतरी विषारी औषध पिल्याने नांदेड शासकीय दवाखान्यात दाखल केले आसता मरण पावला.
सदर प्रकरणी अनिल जनार्दन खराटे माहीतीवरून आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात अकस्मात मुत्यू दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे ,बिटप्रमुख शेख अनसार करत आहे. आठ दिवसापूर्वी डोंगरगावपूल येथे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाली होती.
आजपर्यंत बारा आत्महत्या…
कळमनुरी तालुक्यात (Maratha Samaj reservation) मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आजपर्यंत देवजना,शेवाळा, कान्हेगाव,पिंपरी, डोंगरगावपूल,येहळेगाव तुकाराम, सिंदगी, वारंगा,डीग्रस इत्यादी ठीकाणी (Youth suicide) आत्महत्या झालेल्या आहेत.