देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (World Pharmacist Day) : परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था संचालित (Anuradha Group of Pharmacy) अनुराधा ग्रुप ऑफ फार्मसी इन्स्टिट्युट द्वारे चिखली येथे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे, कॉंग्रेसचे माजी मंत्री व प्रदेश कॉंग्रेस कॅमेटीचे माजी अध्यक्ष मा. माणिकरावजी ठाकरे साहेब व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कॅमेटीचे सरचिटणीस मा. शामभाऊ उमाळकर, जिल्हा संघटन सचिव प्रशांत ढोरेपाटील यांनी या भव्य रॅलीला संबोधित करुन (World Pharmacist Day) फार्मासिस्ट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व हिरवी झेंडी दाखवुन रॅलीला सुरवात झाली.
चिखली केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील तायडे आणि सचिव विनोद नागवाणी व माजी विद्यार्थी नीलेश जैन महावीर मेडिकल, विनोदजी नागवाणी आनंद मेडिकल , कांचन मेडिकल राहुल दवे, सतीश पडघाण आशीर्वाद मेडिकल, मवाळ आयुर्वेदीक मेडिकल शाम मवाळ, अजय मेडिकल विवेक सोलंकी, नीरज लढ्ढा नीशा मेडिकल, श्री अभिराज मेडिकल साखालकर, चिरायू मेडिकल एजन्सि जयंत शर्मा, शिवमुद्रा मेडिकल सचिन गाडेकर, पृथिविराज मेडिकल हितेश गुरुदासणी, अमोल सोलंकी स्वस्त औषधी केंद्र, प्रधानमंत्री जन औषधी केंद्र बस स्थानक चिखली, नवजीवन मेडिकल राजू व्यास, ऋषिकेश आयुर्वेदी मेडिकल अशोकजी भवर, डागा मेडिकल सुचित भराड, चेतन नागवाणी, अमोल सुलाखे, रमेश पाठक, सचिन जगताप, डॉ. सत्तेन्द भुसारी, स्वप्नील तेदे, गजानन शेजोळ, ऋषिकेश खंडागळे, हबीब खान पठान, आशीष चिरावु, स्नेहल वाणखेडे, या चिखली शहरातील सर्व औषध दुकानातील नोंदणीकृत औषध निर्मात्यांना अनुराधा फार्मसी महाविद्यालयातर्फे सन्मानपत्र व फार्मासिस्ट लोगो आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .तसेच अनुराधा को.अर्बन बँक, हिरकणी महिला अर्बन, मुंगसाजी महाराज पतसंस्था चिखली, धनश्री अर्बन व महेश अर्बन या ठिकाणी (World Pharmacist Day) जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त बँक कर्मचाऱ्यांना व्हिट्यामिन बी काॅम्प्लेक्स टॅबलेट वाटप केले.
प्रसंगी कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य डॉ. के.आर. बियाणी, प्राचार्य डॉ. आर.एच. काळे, प्राचार्य डॉ. आर.आर. पागोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच प्रा. यू.एम. जोशी, प्रा. एस.एस. कुळकर्णी, , डॉ. एस.ए. शिंदे, प्रा. डी.पी. अंभोरे, डॉ. एजाज शेख, डॉ. एस.सी. काळे, , डॉ. ए.डी. साखरे, डॉ. बी.ए. मोहिते, डॉ. एच. ए. सावरकर, डॉ. बालाजी ठाकरे, डॉ. पवन फोलाने, डॉ. रूचा इंगळे, प्रा. स्वाती खेडेकर, प्रा. सोनाली मुंढे, प्रा. पूजा गवंडर, डॉ. राहुल रडके, डॉ. हासीब सर व इतर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला हार घालून अभिवादन केले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयाला हार घालून अभिवादन केले. प्रसंगी कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य डॉ. के.आर. बियाणी यांनी फार्मसी क्षेत्राचे महत्त्व उपस्थितांना पटवून देत फार्मासिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असतो, समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र ते आपले योगदान देत असतात त्याचबरोबर रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे कामही फार्मासिस्ट कडून केले जाते असेही ते बोलले. सध्याच्या घडीला नवनवीन आजार उत्पन्न होत असल्याकारणाने या आजारांपासून रुग्णांची मुक्तता व्हावी या दृष्टिकोनातून फार्मसिस्ट बांधवांनी औषधी संशोधनाकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले. (World Pharmacist Day) औषधी निर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला देश तिसऱ्या स्थानी असून आपल्या देशातील निर्मित औषधी हि दर्जेदर व सर्वमान्य असल्याबाबत त्यांनी सांगितले.तसेच विद्यार्थ्यांशी बोलताना फार्मसी क्षेत्राचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचे त्यांनी सोने करावे व अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रत्येक फार्मासिस्टने आपापली कर्तव्ये पार पाडावीत असेही ते बोलले.
महाविद्यालयातील डी.फार्म, बी.फार्म व एम.फार्मच्या सर्वच विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला व सर्वांनी औषध निर्मात्याची शपथ ग्रहण केली . फार्मसी संबंधित, विविध आजारासबंधी माहिती, समुपदेशन, संसर्गजन्य आजार, औषधींचा अतिरेक वापर, औषधीचे दुष्परिणाम, ड्रग – ड्रग इंटरअँक्शन स्लोगनचे बॅनर, घोषणा फलक विद्यार्थ्यांच्या हातात झळकत होते. अतिशय शिस्तीमध्ये जिल्हा परिषद मैदान चिखली ते जयस्तंभ चौक, चिखली इथपर्यंत एका रांगेमध्ये ही रॅली काढण्यात आली. सर्व विद्यार्थाना आणि उपस्थितांना मिठाई देऊन (World Pharmacist Day) रॅलीची सांगता झाली.