अनुराधा अर्बन बॅंकेची 25 वी आमसभा उत्साहात संपन्न
चिखली (Anuradha Urban Bank) : विदर्भासह जिल्हयातील सहकार चळवळीत अग्रगण्य ठरलेल्या अनुराधा अर्बन को.ऑप बॅंकेने सलग तिय-या वर्षीही बॅकेचे नक्त अनुत्पादक कर्ज शुन्य टक्के अबाधीत ठेवीत हॅट्रीकची मजल मारून कर्ज वसुलीचा शिवधनुष्य पेलला आहे. तर आजमितीस बॅंकेने 100 कोटी ठेवीचा पल्ला पार केला असुन अनुराधा अर्बनने (Anuradha Urban Bank) विदर्भातील सहकार क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे. तर राहुलभाउ बोंद्रे यांचा चुकीचे कर्ज वाटप टाळण्याचा फंडा व तगादा न लावता नरमाईने सातत्याने करण्यात येणारी वसुली, हे बॅंकेच्या यशाचे गमक असल्यामुळे लोकांना त्यांचा पैसा सुरक्षीत असल्याचा विष्वास निर्माण झाला आहे. कर्मयोगी तात्यासाहेबांनी लावलेल्या रोपटयाचं राहुल बोंद्रे व त्यांच्या सहकार्यांनी केलेलं वटवृक्षातील रूपांतर पाहुन आपणास मनस्वी आनंद होत असतांना राहुलभाउ तुम्ही छत्रपती व्हा आणि आम्हांला शेलार मामा समजा असा मैत्रीपूर्वक सल्ला देत, बॅकेचा वार्षीक अहवाल हा (Anuradha Urban Bank) बॅंकेच्या प्रगतीचा खरा आरसा असल्याचे प्रतिपादन सत्यजित अर्बन बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष श्यामभाउ उमाळकर यांनी केले.
जिल्हा बॅंकेचे थकीत कर्ज प्रकरणी विरोधकांकडुन वारंवार खोटी आकडेमोड करत ओरड केल्या जाते. मात्र शेतक-यांच्या जिव्हाळयाची असलेल्या जिल्हा बॅंकेची खरी बदनामी विरोधकच करत असुन अदानी आणि अंबानी सारख्या उद्योगपतींना देण्यात आलेली करोडो रूपयांची कर्जमाफी विरोधकांना दिसत नाही का ? असा प्रष्न उपस्थित करीत देशातील बॅंकांवर दिवाळखोरीची पाळी केंद्रातील भाजपा सरकारनेच आणली असल्याचा आरोप (Anuradha Urban Bank) अनुराधा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बांेद्रे यांनी बॅंकेच्या 25 व्या आमसभेप्रसंगी केला. कर्मयोगी स्व. तात्यासाहेब यांनी शैक्षणीक व सहकाराच्या विनलेल्या जाळयातुन परिसराचा विकास साधण्याचे उदिष्ठ ठेवले होते. त्यांनी लावलेल्या अनुराधा अर्बनच्या रोपटयाचे रूपांतर वटवृक्षात झाले असुन 100 कोटींच्या ठेवींचा टप्पा पार करीत बॅंकेने सलग तिस-या वर्षी नक्त अनुत्पादक कर्ज शुन्य टक्के अबाधीत ठेवीत हॅट्रीकची मजल मारल्याचा अपणास सार्थ अभिमान असल्याचे मत बॅंकेचे अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे यांनी व्यक्त केले. बॅंकेच्या या यषस्वी वाटचालीत अथक प्रयत्न घेणारे संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी, कर्जदार, सभासदांचा सिंहाचा वाटा असल्याचेही योवळी त्यांनी आवर्जुन सांगितले.
शुन्य टक्के थकीत एनपीए ची हॅट्रीक हाच अनुराधा बॅंकेच्या प्रगतीचा खरा आरसा : श्यामभाउ उमाळकर
स्थानिक मौनी महाराज संस्थान च्या सभागृहात अनुराधा अर्बन बॅंकेची 25 वी वार्षीक आमसभा उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी (Anuradha Urban Bank) बॅंकेचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थितीत सत्यजित अबॅन बॅंकेचे श्यामभाउ उमाळकर, आमदार धिरज लिगांडे, राजेश्री शाहु परीवाराचे संदिप शेळके तथा सौ.मनिषा शेळके, मुंगसाजी बॅंकेचे दिपक देषमाने, इंदिरा नागरीचे पप्पुसेठ हरलालका, जवाहर अर्बनचे रमेषसेठ बाहेती, विष्णु पाटील कुळसुंदर, समाधान सुपेकर, संजय पांढरे, पांडुरंग पाटील भुतेकर, निलेष गावंडे, सभापती डॉ. संतोष वानखेडे, डॉ. सत्येंद्र भुसारी, नंदु षिंदे, मुकेष वाघ, डॉ. इसरार, जगन्नाथ पाटील, प्रकाष निकाळजे, रामभाउ जाधव, षिवसेनेचे नंदु क-हाडे, अतहरोद्यीन काझी, निलेष अंजनकर, विजय पाटील शेजोळ, ईष्वरराव इंगळे, कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, आसिफ भाई, गोकुळ षिंगणे, सरपंच मनोज लाहुडकर, सुधा मामा काळे, इजिनीअर विजयसिंग राजपुत, दिपक वाघ, बिदुसिंग इंगळे, अमिनखॉ उस्मानखॉ, नासेर सौदागर, सत्तार पटेल, सिध्देष्वर परीहार, साहेबराव पाटील, गफार पटेल सर, षिवराज पाटील, आत्माराम देषमाने, अषोक आंभोरे, रिक्की काकडे, सुरेष बांेद्रे, शहेजादअल्ली खान, यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना आमदार धिरज लिंगाडे म्हणाले कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी उभारलेल्या शैक्षणीक, आद्योगिक, सामाजिक या सर्व संस्थांसह सहकाराच्या माध्यमातुन उभारलेली अनुराधा अर्बन को.ऑप बॅंक प्रगतीच्या षिखरावर असुन उतुंग भरारी घेत आहे. (Anuradha Urban Bank) अनुराधा अर्बन बॅंकेने जिल्हयातील बहुतांषी शेतक-यांना दिलासा देत सुषिक्षीतांना बेरोजगारीवर मात करण्याकरीता आर्थीक उभारी देण्याचे काम आजवर केले आहे. शाहु परीवाराचे संदिप शेळके बोलतांना म्हणाले विदर्भातील मागासलेल्या चिखली सारख्या ग्रामीण भागाशी जोडलेल्या परिसरात कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी सहकार व शिक्षणाची गंगोत्री आनली. त्या तात्यासाहेबांचा वारसा अविरपणे माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे पुढे चालवित आहे, असे सांगित सत्ताधिारी विरोधकांच्या सहकारातील संस्थांना कोणत्याच प्रकारची मदत करत नसल्याची खंत यावेळी संदिप शेळके यांनी व्यक्त केली.
चिखलीतील सहकार क्षेत्रतील विविध पतसंस्था व बॅंका या दिपस्तंभ पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले होते, त्यापैकी मुंगसाजी महाराज नागरी पतसंस्थेचे दिपक देषमाने, जागृती महिली पतसंस्थेचे विजय जागृत व प्रकाष सपकाळ, हिरकणी महिला अबॅनच्या विद्याताई देषमाने, श्रीमती प्रमिलाताई जाधव, संदिप भावसार, जे.बी. इंगळे, यांचा सहकार क्षेत्रातील उल्लेखणीय कामगिरी करीता यथोचित सत्कार करण्यात आला. तर अनुराधा (Anuradha Urban Bank) अर्बनचे संचालक पुरूषोत्तम वायाळ यांची अमरावती विभागीय बॅंकेच्या सहसचिव पदी निवड झाल्याबध्दल सत्कार करण्यात आला. तर उत्कृर्ष कर्जदार म्हणुन गांगालगांव येथील षिवाजी म्हस्के यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर बॅंकेचे वसुलीत उत्कृर्ष कामगिरी करणा-या पियुष बेलोकार व त्यांचे सहकर्मी तसेच उत्कर्ष भागधारक म्हणुन बॅंकेच्या ग्राहकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला (Anuradha Urban Bank) अनुराधा अर्बन बॅकेच्या माध्यमातुन साधत असलेला प्रगतीच्या आलेखाचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गायके यांनी विषद केले. अनुराधा अर्बनच्या आमसभेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, सहकार क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, तथा बॅंकेचे सर्व संचालक, सभासद, भागधारक, समस्त कर्मचारी, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन प्रा.उन्मेष जोषी यांनी तर आभार प्रदर्षन बॅकेचे सह व्यवस्थापक संजय चित्ते यांनी केले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
अनुराधा बॅंकने अतुट विष्वासाने साधली शुन्य टक्के एनपीए ची हॅट्रीक
100 कोटी वरून अधिक ठेवींचा पल्ला पार, तर 150 कोटींचे उदिष्ठ
82.76 लाख इतका शुध्द नफा
बॅंकेचे सी.आर.ए.आर. प्रमाण 9 टक्यापेक्षा वाढीव म्हणजे 17.79 टक्केवर
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा केला सत्कार
शेतकरी, भागधारक, विविध सामाजिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती