आ. श्वेताताई महाले व आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हातून घेतले नारळ पाणी
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली () : जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मुंगसाजी महाराज सहकारी गिरणी व अनुराधा शुगर मिल या दोन संस्थांच्या नावे ९९ कोटी ९५ लाख ६३६ रुपयांचे थकीत कर्ज आहे. त्यामुळेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून अन्नत्याग आंदोलनकर्ते संतोष काळे, पवन डुकरे व अमोल डुकरे यांच्या मागणीनुसार आपण उच्च न्यायालयाला विषयाबद्दल शेतकऱ्यांच्या संतप्त भावना व तीन दिवस चाललेल्या या अन्नत्याग आंदोलनाची माहिती देणार असून आठ दिवसात या प्रकरणाची सुनावणी घेऊन निकाल देण्याची विनंती न्यायालयाला करु, कर्जमाफी प्रकरणी अनुराधा अर्बन बँकेच्या (Anuradha Urban Bank) बँकेने केलेल्या घोटाळ्याबाबत सुद्धा न्यायालयात जोरदारपणे बाजू मांडू व राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांची सूतगिरणी आणि शिक्षण संस्थेला जमीन देऊन भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या जमीन ताब्याबाबतचा आदेश दिवाणी न्यायालयाने दिल्यास त्वरित त्यांना ताबा मिळवून देऊ अशी आश्वासने सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर संतोष काळे, पवन डुकरे, अमोल डुकरे यांनी सावरगाव डुकरे येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा समारोप दि. २५ सप्टेंबर रोजी झाला. आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) व आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी मंदाबाई सिताराम डुकरे यांच्या हस्ते नारळ पाणी प्राशन करून या तिघाही आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित केले. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा हे आंदोलन उभारले जाईल असा इशारा देखील यावेळी संतोष काळे यांनी दिला.
राहुल बोंद्रे यांच्याकडे ९९ कोटी ९५ लाख ६३६ रुपये कर्ज थकीत – जिल्हा उपनिबंधक
सावकारग्रस्त शेतकरी पवन डुकरे, अमोल डुकरे आणि संतोष काळे यांनी तीन प्रमुख मागण्या घेऊन दि. २३ सप्टेंबर पासून तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे थकीत असलेले ९९ कोटी रुपयांचे कर्ज राहुल बोंद्रे यांनी तात्काळ भरावे, २००८ मध्ये शासनाने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये स्वतःच्या (Anuradha Urban Bank) अनुराधा अर्बन बँकेच्या माध्यमातून बोंद्रे (Rahul Bondre) यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी आणि परमहंस रामकृष्ण मोनीबाबा शिक्षण संस्था व मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीच्या स्थापनेसाठी भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशा प्रमुख तीन मागण्या आंदोलकांनी केल्या होत्या. दरम्यान तीन दिवस चाललेल्या या आंदोलनाला सावरगाव डुकरेसह आसपासच्या परिसरातील व चिखली मतदारसंघातील गावोगावचे कास्तकार, विविध सामाजिक व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या संस्थांचे संचालक यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा दर्शवला, त्यामुळे या आंदोलनाची व्यापकता वाढत चालल्याचे निदर्शनास आले होते.
तासभर चर्चा आणि आश्वासन
बुधवार, दि. २५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजेपर्यंत राहुल बोंद्रे यांनी सावरगाव डुकरे येथे सुरू असलेले त्यांचे आंदोलन कोणतीही चर्चा व ठोस आश्वासनाशिवाय गुंडाळले. त्यामुळे या तीन तरुण शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा समारोप कसा होतो याची उत्सुकता सर्वांना लागली होती. या पार्श्वभूमीवर पवन डुकरे, अमोल डुकरे व संतोष काळे यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा समारोप अतिशय परिणामकारक झाला. आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांच्या उपस्थितीत जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात आणि तालुका उपनिबंधक राजेंद्र घोंगे यांच्याशी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. आ. महाले यांनी देखील या चर्चेत भाग घेतला व शेतकऱ्यांची बाजू घेऊन त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना काही खडे सवाल विचारले. राहुल बोंद्रे यांच्या सूतगिरणी व साखर कारखान्यावरील थकबाकीच्या वसुलीस का विलंब लागत आहे ? तिकीट कर्जमाफी बाबत सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्यांना कशाप्रकारे गती मिळू शकेल ?
अनुराधा अर्बन बँकेने (Anuradha Urban Bank) २००८ च्या शेतकरी कर्जमाफीमध्ये केलेल्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण होऊन काय व कधी कारवाई होणार ? तसेच भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी कधी व कशा परत मिळतील ? असे प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले. राहुल बोंद्रे यांच्या संस्थेवर असलेल्या कर्जाबाबत न्यायालयात खटले सुरू असून न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच कोर्टाचा दिलीप वसुलीसाठी केला असता बोंद्रे (Rahul Bondre) यांनी एक कोटी रुपये भरले अनुराधा शुगर मिलवर लिलावाची कारवाई होऊन ११ कोटी रुपयांना कारखाना विकला गेला. तत्पूर्वी १४ वेळेस कारखान्यावर डिक्री आणण्याचे प्रयत्न झाले, अशी माहिती सहकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या चर्चेदरम्यान दिली. या समर्पक चर्चेअंती समाधान झाल्यानंतरच संतोष काळे, पवन डुकरे व अमोल डुकरे यांनी आपले अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केले. परंतु, शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी यावेळी शासनाला दिला.
अन्यथा मलाही अन्न त्याग आंदोलन करावे लागेल – आ. श्वेताताई महाले
संतोष काळे, पवन डुकरे व अमोल डुकरे या तिघांनी सुरू केलेले हे अन्नत्याग आंदोलन केवळ तिघांपुरते नसून लाखो सावकारग्रस्त शेतकऱ्यांचा हा आवाज आहे; याची दखल शासनाला घ्यावीच लागेल. विशेषतः सहकार विभागाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे व हा विषय संवेदनशीलपणे हाताळावा. राहुल बोंद्रे यांच्या सूतगिरणी व साखर कारखान्यावर असलेल्या ९४ कोटी रुपये थकीत कर्जाची तातडीने वसुली सुरू व्हावी, (Anuradha Urban Bank) अनुराधा अर्बन बँकेने केलेल्या शेतकरी कर्जमाफी घोटाळ्याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि बोंद्रे यांच्या संस्थेमुळे भूमीहीन झालेल्या व गाव सोडून जाण्याची पाळी आलेल्या डुकरे कुटुंबीयांना तातडीने न्याय मिळावा हेच या आंदोलनाचे फलित असेल अशा शब्दात आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Rahul Bondre) बोंद्रे यांच्या सर्व गैरव्यवहारांबाबत सहकार विभागाने तातडीने पावले उचलावी व शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा अन्यथा मला देखील अन्नत्याग आंदोलन सुरू करावे लागेल, अशा स्पष्ट शब्दात आ. श्वेताताई महाले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला.
सावरगावचा लाभला उत्स्फूर्त पाठिंबा आणि प्रेम
माझे जन्मगाव येवता असले तरी शालेय शिक्षणाचे सुरुवात सावरगाव डुकरे येथेच झाल्यामुळे या गावाशी माझे बालपणापासूनचे ऋणानुबंध असून एक भावनिक नाते सावरगावशी जोडल्याचे आंदोलनकर्ते संतोष काळे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. त्यामुळे गेल्या तीन दिवसात येथील गावकऱ्यांचे अपार प्रेम, खंबीर पाठिंबा व उस्फूर्त प्रतिसाद आमच्या अन्नत्याग आंदोलनाला मिळाल्याचा ते म्हणाले. आंदोलनस्थळी समारोपप्रसंगी मोठ्या संख्येने जमलेल्या सावरगाव डुकरे येथील शेतकरी व माता-भगिनींच्या प्रतिक्रिया देखील हेच सांगत होत्या. स्थानिक रहिवासी नितीन पाटील यांनी राहुल बोंद्रे यांच्याकडून आजवर सावरगाव डुकरे या गावचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी झाल्याची खंत व्यक्त केली. त्यांच्या शिक्षण संस्थेच्या इमारतींचा मालमत्ता कर देखील बोंद्रे (Rahul Bondre) यांनी भरला नसून तो तात्काळ ग्रामपंचायतकडे जमा करावा, सूतगिरणी, अभियांत्रिकी महाविद्यालय व फार्मसी महाविद्यालयाच्या पत्त्यामध्ये साकेगाव रोड, चिखली या ऐवजी सावरगाव डुकरे, तालुका चिखली असा उल्लेख करावा व बोंद्रे यांच्या सूतगिरणी आणि शिक्षण संस्थेसाठी भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत द्याव्या अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
राहुल बोंद्रेच्या त्या पोस्ट बद्दल तीव्र संताप
सदर अन्नत्याग आंदोलनाचा (Food Abstinence Andolan) समारोप जवळ आला असताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी खोडसाळपणे सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपल्याकडे कोणत्याही कर्ज थकीत नसल्याची खोटी माहिती प्रसारित केली. याबद्दल आंदोलनस्थळी जमलेल्या शेतकऱ्यांमध्ये व सावरगाव डुकरे येथील गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. अशी खोटी माहिती पसरवून शासनाची बदनामी व जनतेची दिशाभूल करणाऱ्या राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थित जनसमुदायाने केली.
या अन्नत्याग आंदोलनाच्या (Food Abstinence Andolan) समारोपप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव एड. सुनील देशमुख, बुलढाणा तालुकाध्यक्ष एड. मोहन पवार, शेतकरी संघटनेचे समाधान कणखर, भाजप चिखली शहर उपाध्यक्ष सुभाषआप्पा झगडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मंचावर शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंह राजपूत, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, चिखली तालुकाप्रमुख गजाननसिंह मोरे, वसंतराव गाडेकर, रुपराव सावळे, भाजपाचे चिखली तालुका अध्यक्ष सुनील पोफळे, भाजपा सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष श्याम वाकदकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, चिखली पंचायत समितीच्या माजी सभापती सिंधुताई तायडे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष नीता जैन, नीता सोळंकी यांची उपस्थिती होती.