Chandan Smuggling

लातूरमध्ये चंदन तस्करीचा मोठा पर्दाफाश! ५४० किलो चंदनासह चौघांना अटक; ११.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूरच्या आनंदवाडीत चंदन तस्करी उघड; चाकूर पोलिसांनी ५४० किलो चंदनासह ११.७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.

लातूरमध्ये चंदन तस्करीचा मोठा पर्दाफाश! ५४० किलो चंदनासह चौघांना अटक; ११.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

चाकूर पोलिसांची आनंदवाडी शिवारात कारवाई; संरक्षित चंदनाच्या झाडांची अवैध तोड, साल काढण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारेही हस्तगत

लातूर जिल्ह्यात संरक्षित चंदनाच्या झाडांची अवैध कत्तल करून त्यापासून मिळणाऱ्या लाकडाची साठवणूक आणि तस्करी करण्याचा प्रकार चाकूर तालुक्यात उघड झाला आहे. आनंदवाडी शिवारात चाकूर पोलिसांनी छापा टाकून तब्बल ५४० किलो चंदन जप्त केले. या कारवाईत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चंदन आणि झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची एकूण किंमत ११ लाख ७० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३५ वाजता चापोली-नायगाव मार्गावरील एका फार्म हाऊसजवळ असलेल्या शेतात पोलिसांनी ही कारवाई केली. मौजे आनंदवाडी शिवारात शासनाची परवानगी नसताना संरक्षित चंदनाची झाडे तोडण्यात आली होती. त्यानंतर झाडांची साल काढून आतील चंदनाचा गाभा आणि लाकडाचे तुकडे वेगवेगळे करून साठवण्यात आल्याचे तपासात समोर आले.

या प्रकरणात नरसिंग रामा बंदराळे (वय ५०, रा. आनंदवाडी, ता. चाकूर), वसंत भानुदास चांनकाणे (वय ४०), संतोष वैजनाथ चांनकाणे (वय ३५) आणि बालाजी भानुदास चांनकाणे (वय ४२, तिघेही रा. वाढवणा, ता. उदगीर) यांच्याविरोधात चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या जप्तीमध्ये चार पोत्यांतील ३० किलो चंदनाचा गाभा असून, त्याची अंदाजे किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे. याशिवाय २८ पोत्यांमध्ये भरून ठेवलेले ५१० किलो चंदनाचे लाकडी तुकडेही आढळले. त्यांचे मूल्य १० लाख २० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे एकूण ५४० किलो चंदन पोलिसांनी ताब्यात घेतले.

चंदनाची झाडे तोडणे आणि त्यांची साल काढण्यासाठी वापरली जाणारी चार लोखंडी वाकस, दोन छन्नी आणि दोन लोखंडी कुऱ्हाडीही घटनास्थळावरून जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस कॉन्स्टेबल अनिल श्रीरामे यांच्या तक्रारीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) आणि भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम ४१ व ४२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एन. चामले करीत आहेत. संरक्षित चंदनाच्या वृक्षांची अवैध तोड आणि त्यातून होणाऱ्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपासाला वेग आला आहे.

संबंधित सामग्री

गोंदियात जंगलात महिलेची निर्घृण हत्या! तीन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने केले सपासप वार

गोंदियात जंगलात महिलेची निर्घृण हत्या! तीन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने केले सपासप वार

गोंदियात पुण्यातील ३५ वर्षीय महिलेची चाकूने वार करून हत्या. अर्जुनी-बोंडराणी जंगलातील घटनेने खळबळ; तीन अज्ञात आरोपींचा शोध सुरू.

Nov 16, 2026
कासारशिरसी पोलिसांची अवैध सावकारीविरुद्ध मोठी कारवाई; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

कासारशिरसी पोलिसांची अवैध सावकारीविरुद्ध मोठी कारवाई; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

Police action in Kasarshirsi: वैध सावकारी परवाना नसताना नागरिकांच्या शेती व घरांच्या मालमत्तांशी संबंधित व्यवहार करून अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध निलंगा तालुक्यातील कासारशिरसी पोलिस...

Nov 13, 2026
मेकअप आर्टिस्ट बनला ड्रग्ज तस्कर! मालाडच्या घरातील पोटमाळ्यावर लपवले ३ कोटींचे कोकेन

मेकअप आर्टिस्ट बनला ड्रग्ज तस्कर! मालाडच्या घरातील पोटमाळ्यावर लपवले ३ कोटींचे कोकेन

मुंबईत मेकअप आर्टिस्टकडून ३ कोटींचे कोकेन जप्त! मालाडमधील घराच्या पोटमाळ्यावर लपवला होता ६७८ ग्रॅमचा साठा; बांगूरनगर पोलिसांची कारवाई.

Nov 12, 2026
नाकाबंदीत पोलिसाला कारने २०० मीटर फरफटले! कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी; थरारक CCTV व्हिडीओ समोर

नाकाबंदीत पोलिसाला कारने २०० मीटर फरफटले! कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी; थरारक CCTV व्हिडीओ समोर

कळंबोलीत नाकाबंदीदरम्यान पोलिस कॉन्स्टेबलला कारने २०० मीटर फरफटले. दिलीप भोई गंभीर जखमी; बनावट नंबर प्लेट असलेल्या कारमधील आरोपींचा शोध सुरू.

Nov 11, 2026
पुण्यात गाडीला कट मारल्याचा वाद जीवावर बेतला! शिवमवर कोयत्याने हल्ला, शरीरावर ७०० टाके

पुण्यात गाडीला कट मारल्याचा वाद जीवावर बेतला! शिवमवर कोयत्याने हल्ला, शरीरावर ७०० टाके

राजगुरुनगरमध्ये गाडीला कट मारल्याच्या वादातून तीन अल्पवयीन मुलांचा शिवम करमारेवर कोयत्याने हल्ला. तीन बोटे तुटली, शरीरावर ७०० टाके.

Nov 11, 2026