मानोरा (Congress candidate Aditi Pohare) : शिक्षकांच्या समस्या सोडविण्या संदर्भात मी या निवडणूक मैदानात उतरलेले आहे. शिक्षकांच्या अनेक अशा समस्या आहेत की, ज्या वर्षानुवर्षांपासून प्रलंबित आहेत. मुख्यतः जुनी पेन्शन योजना यासह अशा अनेक समस्या आहेत. ज्यामध्ये शिक्षक अत्यंत होरपळला जात आहे. यामुळेच शिक्षकांच्या या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून यासाठी निवडणूक मैदानात उतरलेले आहे. असे प्रतिपादन अमरावती शिक्षक मतदार संघाच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अदितीताई पोहरे (Congress candidate Aditi Pohare) यांनी केले आहे. त्या धामणी मानोरा येथील स्व भीमरावजी पाटील सभागृह येथे १२ ऑक्टोबर रोजी आयोजित सभेमध्ये बोलत होत्या.
या सभेच्या अध्यक्षस्थानी व्ही . बी. पाटील हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ चौधरी, काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीपराव सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटक तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे, व . ना. तांडा सुधार योजनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश राठोड, जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेखार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे जिल्ह्यापाध्यक्ष गजानन पाटील, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रामनाथ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष काशीराम राठोड, काँग्रेस कमिटीचे महीला तालुकाध्यक्ष नंदाताई गनोदे, माजी प. स. सदस्य माणिकराव गावंडे आदी उपस्थित होते.

यावेळी मंचावरील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत अदिती पोहरे (Aditi Pohare) यांना प्रथम क्रमांकाच्या पसंती देऊन भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व तसेच तालुक्यातील मतदार शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक राजु भाऊ चौधरी यांनी केले, संचालन प्रा. अनिल घुगे यांनी मानले. तर आभार देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी वसंत राठोड यांनी मानले. या आयोजित सभेला मानोरा शहर व तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.