ग्लोबल सिटीज इंडेक्स 2026

भारतात राहणीमानाचा दर्जा सर्वात निकृष्ट! दिल्ली-मुंबई देशात अव्वल, पण जगात पार शेवटी..

Global Cities Index 2026: भारतातील प्रमुख महानगरे आर्थिक विकास आणि मानवी कौशल्याच्या बाबतीत आघाडीवर असली, तरी नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा आणि पर्यावरणाच्या गुणवत्तेबाबत अद्याप खूप मागे...

भारतात राहणीमानाचा दर्जा सर्वात निकृष्ट! दिल्ली-मुंबई देशात अव्वल, पण जगात पार शेवटी..

Global Cities Index 2026

आर्थिक प्रगतीत दमदार कामगिरी, मात्र पर्यावरण आणि जीवनमानाच्या बाबतीत मोठी पिछाडी!

नवी दिल्ली/ मुंबई (Global Cities Index 2026) : भारतातील प्रमुख महानगरे आर्थिक विकास आणि मानवी कौशल्याच्या बाबतीत आघाडीवर असली, तरी नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा आणि पर्यावरणाच्या गुणवत्तेबाबत त्यांना अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. ऑक्सफर्ड ग्लोबल इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज इंडेक्स 2026 (Global Cities Index 2026) मधील आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. जगातील एक हजार प्रमुख शहरांच्या या क्रमवारीत भारतातील 91 शहरांचा समावेश असून, अनेक भारतीय शहरांनी आर्थिक निकषांवर समाधानकारक कामगिरी केली आहे. मात्र, जीवनमान आणि पर्यावरणाच्या निकषांवर त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र दिसते.

आर्थिक प्रगती, पण मूलभूत सुविधांचे आव्हान

भारतीय शहरांची आर्थिक क्षमता, रोजगाराच्या संधी आणि कुशल मनुष्यबळ या बाबी सकारात्मक ठरल्या आहेत. मात्र, वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा दर्जा यांसारख्या समस्यांमुळे या शहरांच्या एकूण कामगिरीवर परिणाम झाला आहे. (Global Cities Index 2026) भारतातील पहिल्या दहा क्रमांकांवर असलेल्या शहरांचा जागतिक क्रमवारीत पहिल्या 500 शहरांमध्ये समावेश झाला असला, तरी राहणीमानाच्या बाबतीत त्यांना खालचे क्रमांक मिळाले आहेत.

दिल्ली देशात पहिली; पर्यावरणाच्या बाबतीत पिछाडीवर

ग्लोबल सिटीज इंडेक्स 2026 (Global Cities Index 2026)  मध्ये दिल्लीने जागतिक स्तरावर 268 वा क्रमांक मिळवून भारतीय शहरांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. मानवी कौशल्याच्या निकषावर दिल्लीने जागतिक स्तरावर 13 वा, तर आर्थिक निकषावर 116 वा क्रमांक मिळवला आहे. मात्र, राहणीमानाच्या बाबतीत दिल्लीची कामगिरी कमकुवत ठरली असून, या निकषावर शहराला 781 वा क्रमांक मिळाला आहे. पर्यावरणाच्या बाबतीत तर दिल्ली 915 व्या स्थानावर आहे. त्यामुळे आर्थिक आणि मानवी संसाधनांच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या राजधानीसमोर पर्यावरणाचा प्रश्न मोठे आव्हान असल्याचे अधोरेखित झाले आहे.

बंगळुरू आणि मुंबईचीही निराशाजनक कामगिरी

भारतीय शहरांच्या क्रमवारीत बंगळुरूने दुसरे स्थान मिळवले असून, जागतिक स्तरावर ते 311 व्या क्रमांकावर आहे. आर्थिक निकषावर बंगळुरू 176 व्या, तर मानवी कौशल्याच्या बाबतीत 106 व्या स्थानावर आहे. मात्र, राहणीमानाच्या निकषावर शहर 775 व्या आणि पर्यावरणाच्या बाबतीत 528 व्या क्रमांकावर आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जागतिक क्रमवारीत 330 वे स्थान मिळाले आहे. (Global Cities Index 2026)  आर्थिक निकषांवर मुंबई 170 व्या, तर मानवी कौशल्याच्या बाबतीत 77 व्या क्रमांकावर आहे. मात्र, राहणीमानाच्या निकषावर मुंबई 817 व्या आणि पर्यावरणाच्या बाबतीत 782 व्या स्थानावर आहे. आर्थिक सामर्थ्य आणि कुशल मनुष्यबळ असूनही मुंबईला नागरिकांच्या जीवनमानाच्या बाबतीत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.

चेन्नई आणि हैदराबादची स्थिती काय?

चेन्नईने जागतिक क्रमवारीत 381 वा क्रमांक मिळवला आहे. (Global Cities Index 2026)  आर्थिक निकषांवर शहर 263 व्या आणि मानवी कौशल्याच्या बाबतीत 122 व्या स्थानावर आहे. मात्र, राहणीमानाच्या निकषावर चेन्नई 854 व्या, तर पर्यावरणाच्या बाबतीत 633 व्या क्रमांकावर आहे. हैदराबादने जागतिक स्तरावर 421 वा क्रमांक मिळवला आहे. आर्थिक निकषांवर शहर 248 व्या, तर मानवी कौशल्याच्या बाबतीत 241 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पर्यावरणाच्या निकषावर हैदराबाद 657 व्या आणि राहणीमानाच्या बाबतीत 818 व्या क्रमांकावर आहे.

शहरांच्या विकासासोबत जीवनमान सुधारणेही गरजेचे

या (Global Cities Index 2026)  क्रमवारीतून भारतीय महानगरांच्या विकासातील तफावत स्पष्ट होते. आर्थिक वाढ, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी यांबरोबरच स्वच्छ हवा, दर्जेदार सार्वजनिक सुविधा आणि चांगले राहणीमान यांनाही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. शहरांचा विकास केवळ आर्थिक आकडेवारीवर मोजता येत नाही; नागरिकांना मिळणाऱ्या जीवनमानाच्या गुणवत्तेवरही त्याचे मूल्यमापन होणे महत्त्वाचे आहे.

एकूणच, भारतीय शहरांनी आर्थिक आघाडीवर प्रगती केली असली, तरी जागतिक स्तरावर अधिक चांगले स्थान मिळवण्यासाठी पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांचे राहणीमान सुधारण्यावर भर देणे आवश्यक आहे.

संबंधित सामग्री

सोनियांवरील BJP-RSS चा प्रचार खोटा: प्रियांका गांधी

सोनियांवरील BJP-RSS चा प्रचार खोटा: प्रियांका गांधी

Congress MP Priyanka Gandhi: काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वाड्रा यांनी आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘बिलाँगिंग’ या आत्मचरित्रावरून भाजप टीका

Nov 12, 2026
नाकाबंदीत पोलिसाला कारने २०० मीटर फरफटले! कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी; थरारक CCTV व्हिडीओ समोर

नाकाबंदीत पोलिसाला कारने २०० मीटर फरफटले! कॉन्स्टेबल दिलीप भोई गंभीर जखमी; थरारक CCTV व्हिडीओ समोर

कळंबोलीत नाकाबंदीदरम्यान पोलिस कॉन्स्टेबलला कारने २०० मीटर फरफटले. दिलीप भोई गंभीर जखमी; बनावट नंबर प्लेट असलेल्या कारमधील आरोपींचा शोध सुरू.

Nov 11, 2026
दिवाळीपूर्वी FDA ची धडक मोहीम; 9 कोटींचा अन्नसाठा जप्त

दिवाळीपूर्वी FDA ची धडक मोहीम; 9 कोटींचा अन्नसाठा जप्त

Food and Drug Administration: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळ, अवैध साठवणूक आणि निकृष्ट खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात विशेष मोहीम...

Nov 04, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कात मनसेचा दीपोत्सव होणार नाही

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कात मनसेचा दीपोत्सव होणार नाही

महाराष्ट्रातील दुष्काळामुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कात मनसेचा दीपोत्सव होणार नाही. फटाके आणि रोषणाई टाळण्याचे आवाहन.

Nov 04, 2026
आंदोलनांसाठी सार्वजनिक जागा अनिश्चित काळ अडवता येणार नाही! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

आंदोलनांसाठी सार्वजनिक जागा अनिश्चित काळ अडवता येणार नाही! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

सार्वजनिक जागांवरील आंदोलनांना कालमर्यादा हवी, असे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण. दिवाळीतील आंदोलनांवर व्यापाऱ्यांची याचिका.

Nov 03, 2026