लातूर जिल्हा बँक निवडणुक

लातूर जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम वाजले! 

Latur District Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (दि. 12) पासून सुरुवात झाली आहे.

लातूर जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम वाजले! 

Latur District Bank Election

 

15 नोव्हेंबरला मतदान 16 नोव्हेंबरला निकाल; पहिल्या दिवशी 5 अर्ज दाखल!

लातूर (Latur District Bank Election) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (दि. 12) पासून सुरुवात झाली आहे. संचालकांच्या 19 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 15 नोव्हेंबरला सकाळी 8  ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 170 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

1987 ला लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची (Latur District Bank Election) पहिली निवडणूक झाल्यापासून या बँकेवर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे वर्चस्व आहे. 12 ते 16 ऑक्टोबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल होणार असून 19 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर 21 ऑक्टोबरपासून 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहेत. 5 नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार असून या निवडणुकीसाठी 15 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 16 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 2026 ते 2031 या कालावधीसाठी हे संचालक मंडळ राहणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबर 2026 रोजी एकूण 170 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली तर 5 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. त्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी रेणापूर मतदार संघात मोरे सर्जेराव जनार्दनराव यांचे दोन अर्ज, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी जळकोट मतदार संघातून राजजरकर आशिष अजित यांचे दोन अर्ज तर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी उदगीर मतदार संघातून भोसले प्रीती चंद्रशेखर यांचा एक उमेदवारी अर्ज असे एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत 999 मतदार मतदान करणार आहेत.

सत्ताधाऱ्यांचा पहिला डाव यशस्वी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी (Latur District Bank Election) गेली काही दिवस सत्ताधारी व विरोधकांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. बँकेची निवडणूक लवकर घ्यावी, यासाठी लातूर जिल्हा चेअरमन संघटनेने पाठपुरावा केला तर दुष्काळामुळे निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र राज्यामध्ये विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघासाठी तसेच इतर जिल्हा बँकांसाठी निवडणुका होत असताना लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठीच दुष्काळ कसा काय? असा एक मतप्रवाह चर्चेत होता. कदाचित निवडणुका पुढे ढकलून बँकेवर प्रशासक नेमण्याचा विरोधकांचा डाव होता. मात्र अखेर निवडणुका जाहीर झाल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे. निवडणुकीतील बँकेच्या सत्ताधाऱ्यांचे हे पहिले यश असून यापुढे निवडणुकीच्या मैदानात सत्ताधारी व विरोधक आमने-सामने येतात की बँकेची निवडणूक बिनविरोध होते? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

विरोधकांचे नेतृत्व कोण करणार?
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Latur District Bank Election) सत्ताधारी गटाच्या पॅनलचे नेतृत्व अर्थातच माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख हे करणार आहेत. या गटाला निवडणुकीत शह देण्यासाठी विरोधकांकडून कोणते नेतृत्व पुढे येते? याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे. विरोधकांच्या गटाकडून पॅनल मैदानात उतरले जाते की केवळ काही जागांवर निवडणूक लढवली जाते? याचीही उत्सुकता लागली आहे. मात्र याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात AI चा चिखल!

जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात AI चा चिखल!

Latur District Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक मैदानात सध्या होत असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरींनी  मतदार, सोसायट्यांचे चेअरमन आणि शेतकऱ्यांची मोठी करमणूक

Nov 05, 2026
संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून संभाजीराव पाटील निलंगेकरांची आक्रमक भूमिका चर्चेत. बँकेच्या कारभारावरून अमित देशमुखांवर आरोप आणि भाजपसमोर सवाल.

Sep 23, 2026
देशमुख, निलंगेकर अन् जिल्हा बँक; आमदार बसवराज पाटलांच्या सत्कारामागचा हेतू उघड!

देशमुख, निलंगेकर अन् जिल्हा बँक; आमदार बसवराज पाटलांच्या सत्कारामागचा हेतू उघड!

MLA Basavaraj Patil: लातूरकरांनी आमदार बसवराज पाटील यांच्या मंगळवारी सत्कारासाठी खूनी लेटरपॅडचा संदर्भ उघडला. त्यांचे भाषण देशमुख, निलंगेकर आणि जिल्हा बँक परिस्थितीसंबंधीच्या विवादपूर्ण मतांना प्रबोधन

Jul 15, 2026