Someshwar Sugar Factory Election

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत अजितदादा गटाची मोठी कारवाई! पुरुषोत्तम जगताप यांच्यासह बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांच्यासह बंडखोरांची अजित पवार गटातून हकालपट्टी. बारामतीतील राजकीय समीकरणांना नवे वळण.

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत अजितदादा गटाची मोठी कारवाई! पुरुषोत्तम जगताप यांच्यासह बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

Someshwar Sugar Factory Election

सुनेत्रा पवारांच्या इशाऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; भाजपच्या पाठिंब्याने स्वतंत्र पॅनल उभारल्याने अजित पवार गटाचा कठोर निर्णय

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून बारामतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीत अजित पवार गटापासून वेगळी भूमिका घेत स्वतंत्र पॅनल उभारणारे कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने ही कारवाई जाहीर केली असून, त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीतील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा तिरंगी होत आहे. ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल’, ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ आणि ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ यांच्यात लढत रंगणार आहे. विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप हे यापूर्वी अजित पवार यांचे विश्वासू मानले जात होते. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी स्वतंत्र पॅनल उभारण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

सुनेत्रा पवारांच्या इशाऱ्यानंतर कारवाई

पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्यामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली होती. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कोणाचेही नाव न घेता बंडखोरांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता.

“कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, एवढे लक्षात ठेवा. दादा खूप मोठ्या मनाचे होते, दादांसारखी मी नाही,” असे सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या.

आता पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांवर पक्षातून हकालपट्टीची कारवाई जाहीर झाल्याने सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पत्रकार परिषदेत हकालपट्टीची घोषणा

सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर आणि बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव उपस्थित होते.

पक्षाची भूमिका स्पष्ट करताना तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी पुरुषोत्तम जगताप यांनी पक्षाच्या भूमिकेपासून वेगळा मार्ग स्वीकारून स्वतंत्र पॅनल उभे केल्याचे नमूद केले. या पार्श्वभूमीवर जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत चुरस वाढणार

तीन स्वतंत्र पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आधीपासूनच चुरशीची बनली आहे. त्यात पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्याने अजित पवार गटासमोर नवे राजकीय आव्हान निर्माण झाले आहे.

आता जगताप आणि त्यांच्या पॅनलमधील सदस्यांवर झालेल्या कारवाईमुळे निवडणुकीतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या घडामोडींचा निवडणुकीवर काय परिणाम होतो आणि मतदार कोणाला कौल देतात, याकडे बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

ऑपरेशन टायगर नको; आधी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा!, आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला

ऑपरेशन टायगर नको; आधी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा!, आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला

Aditya Thackeray: राहुल गांधी यांनी केलेला फोन टॅपिंगचा आरोप खरा असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Nov 15, 2026
'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

डिलिमिटेशनवर चंद्रशेखर बावनकुळेंचे समर्थन, काँग्रेसवर निशाणा! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतही एनडीएच्या भूमिकेचे सूचक संकेत.

Nov 14, 2026
मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? फडणवीस-शिंदेंना धक्का बसण्याचे संकेत

मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? फडणवीस-शिंदेंना धक्का बसण्याचे संकेत

मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? ५०० कोटींच्या क्लिपनंतर फडणवीस-शिंदेंबाबत मोठे संकेत; SIT चौकशीची मागणी.

Nov 14, 2026
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात तथ्य आहे? विजय वडेट्टीवारांनी फोडली आतली बातमी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात तथ्य आहे? विजय वडेट्टीवारांनी फोडली आतली बातमी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा! काही गोष्टी जवळपास ठरल्याचे सांगत संभाव्य निर्णयाला विरोध.

Nov 14, 2026
अजितदादांच्या अपघातामागील 'मफलरवाला नेता' कोण? रोहित पवारांचा नवा पोस्टर बॉम्ब

अजितदादांच्या अपघातामागील 'मफलरवाला नेता' कोण? रोहित पवारांचा नवा पोस्टर बॉम्ब

अजितदादांच्या विमान अपघातामागील 'मफलरवाला नेता' कोण? रोहित पवार १६ नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार?

Nov 14, 2026