Varangaon Firing

वरणगावमध्ये इन्स्टाग्रामवर ओळख, भेटायला गेला अन् गोळीबार झाला!

वरणगावमध्ये २४ वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार; सात ते आठ हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना.

वरणगावमध्ये इन्स्टाग्रामवर ओळख, भेटायला गेला अन् गोळीबार झाला!

इन्स्टाग्रामवरून तरुणीशी झाली होती ओळख; फुलगाव उड्डाणपुलाखाली भेटायला गेलेल्या सरफराजवर हल्ला, प्रकृती गंभीर

वरणगाव : इन्स्टाग्रामवरून झालेली ओळख आणि भेटण्याचे ठरलेले ठिकाण एका २४ वर्षीय तरुणासाठी जीवघेणे ठरल्याची धक्कादायक घटना वरणगाव शहराजवळ घडली आहे. फुलगाव उड्डाणपुलाखाली सात ते आठ अज्ञात हल्लेखोरांनी सरफराज सैय्यद सकीर सैय्यद याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. त्यानंतर लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात सरफराजच्या खांद्याला आणि पोटात गोळ्या लागल्या असून डोके, हात आणि पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना रविवारी (१ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

जखमी तरुणाचे नाव सरफराज सैय्यद सकीर सैय्यद (२४, रा. काझीपुरा, मुक्ताईनगर) असे आहे. तो भुसावळ येथील एका खासगी कंपनीत चालक म्हणून काम करतो. महिनाभरापूर्वी त्याची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अश्विनी नावाच्या तरुणीशी ओळख झाली होती.

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर भेटण्याचे ठरले; अचानक हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सरफराज मुक्ताईनगर येथील आपल्या घरी जात होता. यावेळी त्याचे अश्विनीशी मोबाईलवर बोलणे झाले. या संभाषणादरम्यान दोघांनी फुलगाव उड्डाणपुलाखाली भेटण्याचे निश्चित केले होते.

ठरलेल्या ठिकाणी सरफराज थांबलेला असताना सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी अचानक मागून येत त्याच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यामुळे तो खाली कोसळला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या हातापायांवरही दांडके आणि रॉडने मारहाण केली.

इतक्यावरच न थांबता, हल्लेखोरांपैकी एकाने गावठी कट्टा काढून सरफराजच्या खांद्यावर आणि पोटाच्या भागात गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत तो घटनास्थळी पडला असताना हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

पोटातील गोळी काढण्यात अडचण; जळगावला हलवले

हल्ल्याची माहिती मिळताच जखमी सरफराजला उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. गोविंदा बेलदार यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, पोटात घुसलेली गोळी खोलवर रुतल्याने ती बाहेर काढण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.

त्यामुळे सरफराजला अधिक उपचारांसाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत जखमी सरफराजची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली. मुक्ताईनगरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.

सरफराजच्या फिर्यादीवरून सात ते आठ अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), ११८ (२), १८९ (४) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

लेकीच्या साखरपुड्यापूर्वीच काळाचा घाला; शेतात विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू

लेकीच्या साखरपुड्यापूर्वीच काळाचा घाला; शेतात विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू

भुसावळच्या सुसरी शिवारात शेतातील तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू. १ नोव्हेंबरला मुलीचा साखरपुडा असताना दुर्घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर.

Oct 27, 2026
नालासोपाऱ्यात तरुणीची धक्कादायक तक्रार; ‘दोन वर्षांत हिंदू संपतील, धर्मांतर कर’; दबाव आणि मारहाणीचा आरोप

नालासोपाऱ्यात तरुणीची धक्कादायक तक्रार; ‘दोन वर्षांत हिंदू संपतील, धर्मांतर कर’; दबाव आणि मारहाणीचा आरोप

नालासोपारा प्रकरणात आरिफ शेखसह तिघांविरोधात गंभीर आरोप. लग्नाचे आश्वासन, धर्मांतराचा दबाव आणि मारहाणीच्या तक्रारीनंतर पोलिस तपासाकडे लक्ष.

Oct 14, 2026
जळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; दोन मुलींसह आई-वडिलांनी रेल्वेसमोर जीव दिल्याची घटना

जळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; दोन मुलींसह आई-वडिलांनी रेल्वेसमोर जीव दिल्याची घटना

अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली.

Aug 27, 2026
परभणीत अति दारू सेवनामुळे ५४ वर्षीय इसमाचा मृत्यू

परभणीत अति दारू सेवनामुळे ५४ वर्षीय इसमाचा मृत्यू

Alcohol Consumption Death: अति दारू सेवन केल्यामुळे ५४ वर्षीय इसमाचा मृत्यु झाल्याची घटना शुक्रवार २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता गंगाखेड शहरातील एमआयडीसी परिसरात उघडकीस

Jul 25, 2026
परभणीत खिडकीतून हात आला अन् लाख रुपयाची चैन लंपास

परभणीत खिडकीतून हात आला अन् लाख रुपयाची चैन लंपास

Parbhani Railway Theft: रेल्वेची गती कमी असताना अचानक खिडकीतून अनोळखी इसमाने हात टाकून एका महिलेच्या गळ्यातून लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन लंपास केली.

Jun 29, 2026