Yunus Shaikh

सहर शेखचे वडील युनुस शेख यांची शिंदे सेनेत नियुक्ती? कळवा-मुंब्रा केबल सेनेचे अध्यक्षपद मिळाल्याने ठाण्यात राजकीय चर्चा

सहर शेखचे वडील युनुस शेख यांना कळवा-मुंब्रा केबल सेनेचे अध्यक्षपद मिळाल्याने ठाण्यात चर्चा सुरू. मात्र, शिंदे सेनेत प्रवेश केल्याचे वृत्त त्यांनी नाकारले.

सहर शेखचे वडील युनुस शेख यांची शिंदे सेनेत नियुक्ती? कळवा-मुंब्रा केबल सेनेचे अध्यक्षपद मिळाल्याने ठाण्यात राजकीय चर्चा

एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वडिलांना एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नियुक्तीपत्र; मात्र युनुस शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे वृत्त फेटाळले

ठाणे : मुंब्र्यातील राजकीय घडामोडींमुळे ठाण्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांना शिंदे गटाच्या केबल सेनेचे कळवा-मुंब्रा अध्यक्षपद देण्यात आल्याचे समोर आले आहे. नियुक्तीपत्रावर एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचा उल्लेख असल्याने युनुस शेख यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, आपण शिवसेनेत प्रवेश केलेला नसून केवळ केबल आणि इंटरनेट सेवेशी संबंधित पद स्वीकारल्याचे युनुस शेख यांनी स्पष्ट केले आहे.

नियुक्तीपत्रामुळे राजकीय चर्चांना उधाण

युनुस शेख यांना नियुक्तीपत्र देतानाचा फोटो समोर आला आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द करताना दिसत आहेत. कळवा-मुंब्रा केबल सेनेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या नियुक्तीमुळे ठाण्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. सहर शेख यांच्या वक्तव्यांवरून यापूर्वी शिंदे सेनेसह महायुतीच्या नेत्यांनी टीका केली होती. आता त्यांच्याच वडिलांना शिंदे गटाशी संबंधित संघटनेत पद मिळाल्याने विरोधकांकडून या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, युनुस शेख यांनी आपण शिंदे सेनेत प्रवेश केल्याचे वृत्त नाकारले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण केबल आणि इंटरनेट व्यवसायाशी संबंधित असल्याचे सांगत, त्याच क्षेत्रातील पद आपल्याला देण्यात आले आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

मात्र, नियुक्तीपत्रात एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख असल्याने या स्पष्टीकरणावरूनही राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होत आहेत. केबल सेना शिंदे गटाच्या अखत्यारित येत असल्याच्या पार्श्वभूमीवर या नियुक्तीचे राजकीय अर्थ लावले जात आहेत.

सहर शेखचे भाषण व्हायरल; विरोधकांवर केली होती टीका

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेल्या सहर शेख हिचे विजयानंतरचे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या भाषणात तिने ‘कैसा हरायाsssss...’ असे म्हणत विरोधकांना डिवचले होते. तसेच आगामी काळात संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्या या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. महायुतीतील नेत्यांसह शिंदे सेनेच्या नेत्यांनीही तिच्यावर टीका केली होती.

जितेंद्र आव्हाड आणि युनुस शेख यांच्यातील जुना वाद

युनुस शेख हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक होते. मात्र, कालांतराने दोघांमधील संबंध बिघडल्याचे सांगितले जाते. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत युनुस शेख यांनी आपल्या मुलीसाठी शरद पवार यांच्या गटाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने सहर शेख हिने एमआयएमकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

विजयानंतर आयोजित सभेत युनुस शेख आणि सहर शेख या पिता-कन्येने जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. आव्हाड यांना आपण ‘जीजी’ हे नाव दिले आणि ते महाराष्ट्रात लोकप्रिय झाले, असे युनुस शेख यांनी म्हटले होते. तसेच अल्लाहतालाने आपल्या मुलीला ‘हिजाबवाली बेटी’ म्हणून लोकप्रिय केल्याचा दावाही त्यांनी केला होता.

यापुढे कोणत्याही मुलीच्या भविष्याशी खेळू नये, असा इशारा देतानाच आपल्या मुलीला उमेदवारी नाकारल्यानंतर तिला एमआयएममधून निवडून आणल्याचे त्यांनी सांगितले होते. प्रभाग क्रमांक ३० मध्ये जितेंद्र आव्हाड दिसल्यास त्यांना जाब विचारू, अशा आक्रमक शब्दांत त्यांनी आव्हाड यांना आव्हान दिले होते.

आता युनुस शेख यांना मिळालेल्या नव्या पदामुळे ठाणे आणि मुंब्र्यातील राजकीय चर्चांना पुन्हा वेग आला आहे. त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे की केवळ केबल सेनेचे पद स्वीकारले आहे, याबाबत त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम आहे.

संबंधित सामग्री

ऑपरेशन टायगर नको; आधी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा!, आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला

ऑपरेशन टायगर नको; आधी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा!, आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला

Aditya Thackeray: राहुल गांधी यांनी केलेला फोन टॅपिंगचा आरोप खरा असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Nov 15, 2026
'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

'छोटे मतदारसंघ, चांगला विकास'; बावनकुळेंनी सांगितले डिलिमिटेशनचे महत्त्व

डिलिमिटेशनवर चंद्रशेखर बावनकुळेंचे समर्थन, काँग्रेसवर निशाणा! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतही एनडीएच्या भूमिकेचे सूचक संकेत.

Nov 14, 2026
मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? फडणवीस-शिंदेंना धक्का बसण्याचे संकेत

मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? फडणवीस-शिंदेंना धक्का बसण्याचे संकेत

मनोज जरांगे पुन्हा ऑडिओ बॉम्ब फोडणार? ५०० कोटींच्या क्लिपनंतर फडणवीस-शिंदेंबाबत मोठे संकेत; SIT चौकशीची मागणी.

Nov 14, 2026
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात तथ्य आहे? विजय वडेट्टीवारांनी फोडली आतली बातमी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात तथ्य आहे? विजय वडेट्टीवारांनी फोडली आतली बातमी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा! काही गोष्टी जवळपास ठरल्याचे सांगत संभाव्य निर्णयाला विरोध.

Nov 14, 2026
अजितदादांच्या अपघातामागील 'मफलरवाला नेता' कोण? रोहित पवारांचा नवा पोस्टर बॉम्ब

अजितदादांच्या अपघातामागील 'मफलरवाला नेता' कोण? रोहित पवारांचा नवा पोस्टर बॉम्ब

अजितदादांच्या विमान अपघातामागील 'मफलरवाला नेता' कोण? रोहित पवार १६ नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार?

Nov 14, 2026