नांदेड (Nanded) :- आज २० जानेवारी रोजी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास झुडीओ बोरबन येथे दिव्या अपार्टमेंट येथील पवन पोपशेठवार यांच्या मालकीच्या तीन मजली असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यामधील हॉलमध्ये आग लागली होती.
इमारतीच्या डाव्या बाजूस सुयोग किड्स स्कूल व उजव्या बाजूस डॉक्टर भंडारे हे राहत होते
डिलिव्हरी होज लाईनवर पर्यंत घेऊन जाऊन ती आग (Fire) विजवण्यात आली. सदरील इमारतीमध्ये भाडेकरू राहत होते. त्यांचे अंदाजे 15 लाख नुकसान झाल्याचे सांगितले. तसेच या इमारतीच्या डाव्या बाजूस सुयोग किड्स स्कूल व उजव्या बाजूस डॉक्टर भंडारे हे राहत होते आगीला इतरत्र पसरू न देता वेळेतच तिला आटोक्यात आणून विझविण्यात आली. अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, गायकवाड, साजिद, नरवाडे, मोरे, पानपट्टे, शिंदे यांनी आग विझवण्याचे कार्य केले.