मानोरा(washim):- तालुक्यातील पाळोदी व शेंदूरजना रोडवर पळोदी जवळ दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७.४० वाजताच्या सुमारास ॲपे व ट्रॅक्टरची(tractor) समोरासमोर धडक झाल्याने ॲपेमधील ७ जण जखमी झाल्याची घटना घडली.
सविस्तर असे की, पळोदी येथून शेंदुरजनाकडे ॲपे क्रमांक एम एच – २९ आय डब्लू प्रवाशी भरून जात होते. तर शेंदूरजना वरून पळोदी कडे ट्रॅक्टर क्रमांक आर जे – ०६ आर सी येत असताना पळोदी जवळ समोरासमोर धडक(hit) झाली. या धडकेत ॲपेमध्ये चालक कुंडलिक झळके वय ३५ वर्ष, प्रवासी चंदाबाई वय वर्ष ३२, जोताबाई ३० वर्ष, ओम बल्हाल १८ वर्ष, नितीन गोदमले ७ वर्ष व २ लहान होते. अपघातातील सर्व जखमींना १०८ वाहनाला पाचारण करून उपचारासाठी वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात(hospital) हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.