कारंजा(Washim) :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या अनेक महिलांचे ऑनलाईन(Online) अर्ज त्रुटीत अडकले आहेत. अशा महिलांनी त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण अर्ज तातडीने पुन्हा अपलोड करावे, असे आवाहन तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी केले आहे.
तहसीलदार कुणाल झाल्टे यांचे आवाहन
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी (CM Laadki Bahin Yojna)लाडकी बहिण योजनेचा पहिला हफ्ता वितरित करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून ऑनलाईन अर्ज पडताळणी करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. संपूर्ण ऑनलाईन अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिलाना तसा मोबाईल संदेश प्राप्त होत आहे. परंतु, या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या असंख्य महिलांचे अर्ज त्रुटीत सापडले आहेत. त्रुटीत अर्ज असणाऱ्या महिलांना देखील तसा मोबाईल संदेश (Massage)पाठवण्यात आला आहे. तरी त्यांनी ज्या ठिकाणी अर्ज ऑनलाईन केला होता, त्या ठिकाणी जावून आपल्या त्रुटींची पुर्तता करून घ्यावी व अर्ज तातडीने पुन्हा अपलोड करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी केले आहे.