लातूर (Latur):- एकेकाळी राज्यात मोठा नावलौकिक असलेल्या लातूर बाजार समितीच्या महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) भाजीपाला मार्केट व गुळ मार्केट ची दुरवस्था झाल्याने लातूरचे नेते ऍड किरण जाधव व समाज पटेल यांनी सभापती जगदीश बावणे यांच्यासोबत मार्केटचा आढावा घेतला सभापतींसह वास्तुविशारद व अधिकारी या पाणी वेळी उपस्थित होते. आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेवरून ही पाहणी केली गेल्याची चर्चा आहे. यावर्षी विविध वांदे निर्माण झाल्याने लातूर बाजार समिती चर्चेत राहिली आहे. लाखो रुपये खर्चूनही बाजार समितीमध्ये (Market Committee) सोयी सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांसह व्यापार हमाल मापाडी आदी वर्गाकडून होत असतात. मात्र बाजार समितीचे कारभारी हे केवळ नामधारी असल्याचे चित्र अनेक प्रकरणातून पुढे आले आहे.
किरण जाधव व समद पटेलांकडून ‘मार्केट’चा आढावा
दरम्यान भाजी मंडईत व गुळ मार्केटमध्ये शेतकऱ्यांना व खरेदीदारांना योग्य त्या सोयी सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. कदाचित या तक्रारी आल्याने लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी या मार्केटची पाहणी करण्याची सूचना दिल्याने सभापती जगदीश बावणे, लातूरचे नेते समद पटेल, किरण जाधव आदींनी मार्केटची पाहणी केली. यावेळी बाजार समितीचे संचालक बालाजी वाघमारे, वास्तु विशारद अभिलाष बरबडे तसेच बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते. वास्तु विशारद सोबत असल्याने बाजार समिती गुड मार्केट व भाजी मंडई नव्याने विकसित करेल, अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे.