पंधरा जणाविरूद्ध गुन्हा दाखल
आखाडा बाळापूर (Sukliveer Sword Attack) : कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद विवाद होउन तिघांना तलवार,लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी करण्यात आले यातील जखमीना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. सदर प्रकरणी पंधरा जणाविरूद्ध बुधवार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी भेट दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 11फेब्रुवारी दुपारी सुकळीवीर ग्रामपंचायत समोर घरातील केलेल्या किचन ओट्याच काम पसंत नसल्याच्या कारणावरून वाद विवाद होउन सलमान खान हलीम खान पठाण,शाबास खान,असीफ खान यांना गैरकायद्याची मंडळी जमवून तलवार, लोखंडी रॉडने,काठीने डोक्यावर, हातावर, पायावर मारहाण करून जखमी करण्यात आले. (Sukliveer Sword Attack) याबाबत सलमान खान हलीम खान फीर्यादीवरून चांदू धुमाळे,तुकाराम खंदारे, सखाराम खंदारे,सुनील सरकुंडे ,अजय खुपसे,सुदाम खरोडे,गजानन भुरके, हनुमान सरकुंडे,कीशोर खंदारे, तुकाराम कपाटे,संधू धुमाळे सर्व सुकळीवीर व दशरथ शिरळे तोंडापुर व इतर तिन जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान घटनास्थळी तातडीने पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे,पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, डोंगरकडा पोलीस चौकी प्रमुख संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव ,शिवाजी पवार पोलीस पथकाने भेट देऊन शांतता राखण्यासाठी पावले उचलली. पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे,पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन वादविवाद होउनये ,कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे शांतता बैठक घेतली.




