सडक अर्जुनी (Arjuni Accident) : नवेगावबांध मार्गावर चारचाकी वाहनाने लापरवाहीने चालवून दुचाकीला (Arjuni Accident) जबर धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर पती व ३ वर्षीय मुलगी जखमी झाली. ही (Gondia CRime) घटना कोहमारा-नवेगाव टी-पॉर्ईटसमोर ६ जूनच्या सायंकाळी ६.१५ वाजता सुमारासची आहे. शितल राहुल बडोले (२८) रा.साई माहुली कॉलनी फुलचूर गोंदिया असे मृतक महिलेचे नाव आहे. तर राहुल यादोराव बडोले (३८) व राजवी राहुल बडोले (०३) असे जखमींचे नाव आहे.
कोहमारा-नवेगावबांध टी-पॉईटसमोरील घटना
माहितीनुसार, गोंदियाच्या फुलचूर येथील साई माहुली कॉलनी निवासी असलेले राहुल बडोले हा पत्नी शितल बडोले व ३ वर्षीय चिमुकली राजवी बडोले यांना घेवून दुचाकी क्र.एमएच-३५/आर-३५५२ ने जात होते. नवेगावबांध मार्गावर कोहमारा-नवेगाव टि-पॉईटवर पांढर्या रंगाचा वाहन क्र.जेएच-०५/ ए/५४४६/वाय/२४ च्या चालकाने लापरवाहीने चालवून राहुल बडोले याच्या दुचाकीला जबर धडक दिली. या (Arjuni Accident) घटनेत शितल बडोले ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी (Arjuni Hospital) रूग्णालयात हलविले असता त्यांचा मृत्यू झाला. तर राहुल बडोले व राजवी बडोले हे जखमी झाले असून त्यांच्या उपचार सुरू आहे. फिर्यादी कालीदास सुखदेव लाडे (५२) रा. वार्ड क. २ कोहमारा ता. सडक अर्जुनी यांच्या तक्रारीवरून (Gondia Police) डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा उईके करीत आहेत.