16 जणांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे
महायुती व महाविकास आघाडी मधे बंडखोरी
अर्जुनी मोर (Arjuni Assembly Election) : 20 नोव्हेंबर ला होणा-या विधानभेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या 63 अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे शेवटच्या दिवसी ता.4 रोजी 16 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 19 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत अजय लांजेवार व गोंदिया जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष रत्नदीप दहिवले यांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडी व महायुतीत बंडखोरी ली आहे.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात (Arjuni Assembly Election) एकुण 35 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.आज ता.4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे शेवटच्या दिवसी मनोहर चंद्रिकापुरे,राजेश नंदागवळी,किरण कांबळे, जगण गडपाल,विश्वनाथ खोब्रागडे,निशांत राऊत,किरण कटारे, प्रदिप गणवीर, हरिष बन्सोड, मिथुन मेश्राम, यशवंत उके, अशोककुमार लांजेवार,अँड.पोमेश्वर रामटेके, डाॅ.भारत लाडे,दानेश साखरे, रिता अजय लांजेवार अशा 16 लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या (Arjuni Assembly Election) निवडणुकीत अजय लांजेवार व रत्नदिप दहीवले यांनी निवडणुकीचे रणशिंग पुकारल्याने महाविकास आघाडी व महायुतीत बंडखोरी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आता 19 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महाविकास आघाडी तर्फे काॅग्रेस चे दिलीपभाऊ बन्सोड व महायुती तर्फे राजकुमार बडोले तथा प्रहार जनशक्तीचे तथा आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे चिरंजीव डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांचे मधे खरी लढत होवुन या विधानसभेत तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.या क्षेत्रात काॅग्रेसचे डाॅ.भारत लाडे तथा राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे दानेश साखरे यांचा जनाधार व लोकप्रियता पहाता हे दोघेही निवडणुक लढणार हे जवळपास निश्चित समजल्या जात होते.मात्र ऐनवेळेवर या दोघेही दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात असुन त्यांचे कार्यकर्त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.