अर्जुनी/मोरगाव (Arjuni Assembly Elections) : सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीसाठी 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांच्या मतदानाला सुरुवात झाली असुन अनेक मतदारसंघात ही मतदान प्रक्रिया पार पडली आहे.सध्या राज्यात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अजून प्रचाराचे 8 दिवस शिल्लक आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर 2024 मतदान पार पडणार आहे. या (Arjuni Assembly Elections) विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये.
यासाठी लोकसभा 2024 निवडणुकी प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही 85 वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय भारत निवडणुक आयोग यांच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंबंधी गोंदिया जिल्ह्यातील 63 अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी दि.9 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवार ला केशोरी येथील दिव्यांग मतदार देवराम कृष्णा उईके याने (Arjuni Assembly Elections) गृहमतदान प्रक्रिया दरम्यान आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.विशेष म्हणजे दिव्यांग मतदार देवराम कृष्णा उईके यांच्या आईचे देहांत होऊन घरी आईचे मृतदेह असतांनी शुद्धा स्वयमवृत्तीने मतदानाचा अधिकार बजावुन देवराम याने एक आदर्श निर्माण केला आहे.
तर मतदान आपला हक्क असुन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन देवराम याने केले आहे. यावेळी सुक्ष्म निरीक्षक आकाश तेलंग,झोनल अधिकारी संजु शाहारे,मतदान अधिकारी तथा मंडळ अधिकारी पुंडलिक कुंभरे,मतदान सहायक तथा तलाठी नावेद शेख,पोलीस शिपाई राहुल चिचमलकर यांनी गृह मतदान प्रक्रिया पार पाडली.
अर्जुनी/मोरगाव – सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीसाठी 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांच्या (Arjuni Assembly Elections) मतदानाला सुरुवात झाली असुन अनेक मतदारसंघात ही मतदान प्रक्रिया पार पडली आहे.सध्या राज्यात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अजून प्रचाराचे 8 दिवस शिल्लक आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर 2024 मतदान पार पडणार आहे.या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये.
यासाठी लोकसभा 2024 निवडणुकी प्रमाणेच (Arjuni Assembly Elections) विधानसभा निवडणुकीतही 85 वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय भारत निवडणुक आयोग यांच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंबंधी गोंदिया जिल्ह्यातील 63 अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी दि.9 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवार ला केशोरी येथील दिव्यांग मतदार देवराम कृष्णा उईके याने गृहमतदान प्रक्रिया दरम्यान आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.विशेष म्हणजे दिव्यांग मतदार देवराम कृष्णा उईके यांच्या आईचे देहांत होऊन घरी आईचे मृतदेह असतांनी शुद्धा स्वयमवृत्तीने मतदानाचा अधिकार बजावुन देवराम याने एक आदर्श निर्माण केला आहे.
तर मतदान आपला हक्क असुन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन देवराम याने केले आहे. यावेळी सुक्ष्म निरीक्षक आकाश तेलंग, झोनल अधिकारी संजु शाहारे, मतदान अधिकारी तथा मंडळ अधिकारी पुंडलिक कुंभरे, मतदान सहायक तथा तलाठी नावेद शेख, पोलीस शिपाई राहुल चिचमलकर यांनी गृह मतदान प्रक्रिया पार पाडली.