अर्जुन मोर (Arjuni Crime) : अर्जुनी मोर.पोलीश स्टेशन (Arjuni Police) अंतर्गत घडलेल्या उसनवारीने दिलेल्या पैशावरून छातीवर चाकूने वार केले. जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. मात्र अद्यापही दोन आरोपी गेल्या तीन महिन्यापासून फरारच आहेत. वैभव प्रकाश बनकर यांचा कुंभीटोला (बाराभाटी) येथे तिरंगा ढाबा आहे. येथे २८ मे च्या रात्री १० वाजताचे सुमारास आरोपी रोहित हिरालाल रामटेके (२५) वडसा, अजय श्याम दुपारे (३०) चंद्रपूर व संदीपसिंग समदरसिंग टाक (२५) रामपूर चंद्रपूर यांनी संगणमत करून फिर्यादीचे ढाब्यावर गेले. त्यांच्या छातीवर वार करून जखमी केले. (Arjuni Crime) जीवे मारण्याचा प्रयत्नही केला.
फिर्यादीच्या तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी कलम ३०७, ५०४,३४ भादवी अन्वये गुन्हा (Arjuni Crime) नोंदविला आहे. यातील आरोपी अजय श्याम दुपारे व संदीपसिंग समदरसिंग टाक हे आरोपी घटना तारखेपासून फरार आहेत. दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. कुणाला माहिती असल्यास (Arjuni Police) अर्जुनी मोरगाव पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक घनश्याम रोहनकर यांनी केले आहे.