केशोरी पोलीसांची सलग दुसरी कारवाई
अर्जुनी/मोरगाव (Arjuni Crime) : तालुक्याच्या केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीतुन अवैध गुरांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती केशोरी पोलीसांना मिळाल्याने केशोरी पोलीसांनी गोठणगाव ते नवेगाव/बांध वनविभागाच्या विश्रामगृहा समोर गोठणगाव येथे सापळा रचला या दरम्यान 12 ऑगस्ट ला दुपारी 03.30 वाजता एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा GENIO क्रमांक एम.एच 49 डी.1124 असलेल्या मालवाहु वाहनास थांबवुन सदर वाहनाची कसुन तपासणी केली असता.त्या वाहनात एकुण 09 गोवंश जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था न करता क्रूरपणे दाटीवाटीने सदर वाहनात कोंबुन अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.
वाहन व पशुधन एकुण 5 लाख 90 हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेवुन गाडीमधून 09 जनावरांची सुटका करुन वाहनातील 02 इसम नामे अशोक रतीराम पातोळे व कालीदास हिरामण नेवारे यांच्यावर विविध कलमान्वये पोलीस स्टेशन केशोरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार होळी करीत आहेत.सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक गोरख भामरे,अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा,देवराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे,पोलीस हवालदार होळी, रामटेके,पोना.चिचमलकर,कुहीकर,पो.शि.भेंडारकर चापोशि.पुस्तोडे यांनी केली आहे.तर केशोरी पोलीसांनी सलग दुसरी कार्रवाई केल्यामुळे नागरिकांनी केशोरी पोलीसांचे कौतुक केले आहे हे विशेष.