अर्जुनी मोर (Arjuni Heavy Rain) : गेल्या चार दिवसापासून अर्जुनी मोर तालुक्यात तसेच सर्वत्र होत असलेल्या (Heavy Rain) मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे भरून वाहत आहेत. अशातच बंगाली वसाहत असलेल्या गौरनगर येथील राजीव अनंत अधिकारी वय 11 वर्ष हा 21/० 6/ 2024 ला सायंकाळी पाच वाजता मित्रासह गावाशेजारील नाल्यावर आलेला पूर पाहण्यासाठी गेला.
त्यामध्ये त्याचा पाय घसरून तो पाण्यात वाहत गेला मात्र साथीदार मित्रांनी ही गोष्ट त्यांच्या घरापर्यंत न सांगितल्याने रात्र पर्यंत मुलगा घरी न आल्याचे सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. शेवटी आज त्या मुलाचा शोधाशोध करूनही अजून पर्यंत पत्ता लागलेला नाही. त्या मुलांच्या शोध कार्यात शोध पथक लागलेला असून त्यांच्या (Heavy Rain) वाहून गेल्यामुळे बंगाली वसाहतीमध्ये सुखकळा पसरली आहे.