कारंजा(Washim):- शेत रस्त्याच्या कारणावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी(armed conflict) झाली. या घटनेत एकूण १० जण जखमी झाले असून, परस्पर विरोधी गटाच्या तक्रारीवरून एकूण ३५ जणांविरुद्ध गुन्हा (crime)दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास स्थानिक गवळीपुरा येथे घडली.
३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कारंजा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेताच्या रस्त्याच्या कारणावरून दोन्ही गट एकमेकांविरुद्ध भिडले. यामध्ये त्यांनी काठी, लोखंडी पाईप, कुऱ्हाड, दगड, विटा आदीने एकमेकांना मारहाण केल्याने एका गटातील रुक्सार इस्माईल गारवे, नंदा घासी गारवे, सलीम नंदा गारवे, शबनम नंदा गारवे तर दुसऱ्या गटातील सुभान लल्लू गारवे, रमजान रज्जाक गारवे, रुक्साना रज्जाक गारवे, मुमताज गारवे, तालिफ नौरंगाबादी, युसुफ गारवे आदी जखमी झाले. दरम्यान, याप्रकरणी सुभान लल्लु गारवे (४८, रा. गवळीपुरा ) यांच्या फिर्यादीवरुन सलीम नंदा गारवे, उस्मान नंदा गारवे , इस्माईल नंदा गारवे , सोहेल सलीम गारवे, चांद लल्लू गारवे, महेबुब चाँद गारवे, फिरोज चाँद गारवे , रहिम चाँद गारवे, रन्नु चाँद गारवे , जुम्मा चंदु पप्पुवाले, समीर तुकड्या नौरंगाबादी, तुकड्या भिका नौरंगाबादी, फिरोज चाँद गारवे, शमीना सलीम गारवे, रुकसार इस्माईल गारवे, जैतून उस्मान गारवे, अमिना नजीर नौरंगाबादी, शमीना तुकड्या नौरंगाबादी , जैतून नंदा गारवे जम्मन चंदु पप्पुवाले , फरहान नजीर नौरंगाबादी सर्व रा.गवळीपुरा कारंजा यांच्याविरुद्ध कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०,११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) बिएनएस २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गटातील दहा जण जखमी
तर उस्मान नंदा गारवे (४२, रा. गवळीपुरा ) यांच्या फिर्यादीवरून सुभान लल्लू गारवे , रज्जाक लल्लू गारवे, युसूफ लल्लू गारवे, तालिब मुस्ताक नौरंगाबादी, रमजान रज्जाक गारवे , समीर रज्जाक गारवे, ज़मीर रज्जाक गारवे , हसीना मुस्ताक नौरंगाबादी , बीबी सुभान गारवे , रुबिना मुस्ताक नौरंगाबादी, मुन्नो सुभान गारवे, फिरोजा युसूफ गारवे, रुकसाना रज्जाक गारवे, मुमताज सुभान गारवे सर्व रा. गवळीपुरा यांच्याविरुद्ध उपरोक्त कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.