कोरची (Gadchiroli):- आरमोरी विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने च्या वतीने गुरुवार पासून जनसंवाद परिवर्तन यात्रेची सुरुवात कोरची तालुक्यातून करण्यात आली. या यात्रेची सुरुवात तालुक्यातील श्रध्दास्थान असलेल्या ढोलीगोटा येथून विधिवत पणे पूजा अर्चना करून करण्यात आली. काँग्रेस पक्ष (Congress party) कोरची चे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल यांच्या नेतृत्वात ही जनसंवाद परिवर्तन यात्रा कोरची तालुक्यात आयोजित करण्यात आली असून येत्या रविवार पर्यंत ही जनसंवाद परिवर्तन यात्रा कोरची तालुक्यात सुरु राहणार आहे.
सदर यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवक, महिला, व्यापारी, विद्यार्थी, विद्यार्थीनींचे व अशा अनेक घटकांच्या समस्येच्या विरोधात संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रात जनसंवाद परिवर्तन यात्रा ही सुरु राहणार असून गुरुवारी कोरची येथील आठवडी बाजारात ही जनसंवाद परिवर्तन यात्रा काढून जनतेशी संवाद करून त्यांची समस्या जाणून नागरिकांशी चर्चा करण्यात आली. यावेळी शहरात छोटे कॉर्नर सभा घेण्यात आली. यानंतर संध्याकाळी टेमली या गावात भेट देऊन नागरिकांशी संवाद करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते रामदास मसराम, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष सौ. प्रेमिला काटेंगे, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सदरुद्दीन भामानी, काँग्रेस जिल्हा महासचिव हकीमुद्दीन शेख, नगरपंचायत कोरची नगराध्यक्ष सौ. हर्षलता भैसारे,जितू चौधरी, लंकेश ढोरे, रेशीम प्रधान, आकाश पेटकुले, रोशन कवासे, गोपाल दोणाडकर आदी सह बहुसंख संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.सदर जनसंवाद व परिवर्तन यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन येत आहे.