छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती
कोरची (Armory Assembly Election) : आरमोरी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांची आज कोरची येथे सभा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हेलिकॉप्टर दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, मोहला छत्तीसगडचे आमदार इंद्रशाय मडावी, सुरेंद्र सिंग चंदेल, महेश कोपुलवार, रोहिदास राऊत, इलियास खान, शामभाऊ मस्के, अमोल मारकवार, जीवन नाट, जयंत हरडे, परसराम टिकले, मनोज अग्रवाल तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी कोरची, प्रतापसिंग गजभिये राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, डॉ. नरेश देशमुख शिवसेना तालुका अध्यक्ष, रामदास साखरे, हकीमुद्दिन शेख, जगदीश कपूरडेहरिया, नंदू नरोटे आदी उपस्थित होते.
भाजपच्या खोट्या आश्वासनाला बळीपडू नका विद्यमान आमदाराने सुद्धा (Armory Assembly Election) आरमोरी विधानसभेत कुठलेही कामे केलेली नाही म्हणून यावेळेस अशा आमदारांना घरचा रस्ता दाखवा व महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा तसेच आमची सत्ता आल्यास राहुल गांधी यांनी जाहीर केलेले पंचसूत्रे घोषणापत्र अमलात आणू असे आवाहन सुद्धा यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
आमचा उमेदवार 24 कॅरेट खरा माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल
भारतीय जनता पक्षाचे मागील दहा वर्षापासून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांची कोर्टात तारीख सुरू असून ते खरे आदिवासी नाही तर आमचा 24 कॅरेटचा खरा आदिवासी असून आमच्या खरा आदिवासीला यावेळेस प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन यावेळी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.
विद्यमान आमदार यांनी परिसराची कुठलीही कामे केली नाही – रामदास मसराम
आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, माताभगिनी व (Armory Assembly Election) आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुठलीही समस्या विद्यमान आमदार यांनी मागील दहा वर्षांपासून सोडवली नाही फक्त लोकांशी गोड बोलून नागरिकांना फसवण्याचे कार्य या आमदाराने केले आहे आता या आमदारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असून घेणाऱ्या वीस तारखेला मला प्रचंड बहुमताने निवडून आपला आशीर्वाद द्यावा असे आवाहन यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांनी केले.
महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळीसर्व कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आतिषबाजी व आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य करून करण्यात आले.
यावेळी परमेश्वर लोहंबरे, श्रावण मातलाम, उदल कोरेटी, रामसुराम काटेंगे, वसीम शेख, महेश नरोटे, प्रेमिलाताई काटेंगे, हर्षलता भैसारे, दीपक हलामी, राजेंद्र नैताम, हेमंताताई शेंडे, विठ्ठल शेंडे, ज्योतीताई भैसारे, कचरीताई काटेंगे, कौशल्या केंवास, कांता जमकातन, धनीराम हिडामी, बाबुराव मडावी, विरेंद्र मडावी, तेजस्विनी टेंभुर्णे, निरा बघवा, सुनील मडावी, महेश करसी, लहानू सहारे, व्यंकट वाळदे, शामा गुरनुले, तिलक सोनवानी, रामाधार सिरसाटी, पंजाबराव उईके व इतर हजारो कार्यकर्ते बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.