मानोरा (Manora) :- ज्ञान, साधना, मेडीटेशन हे जीवनात बदल घडवतात. मेडीटेशन हे जीवनाला वेगळे वळण देतात, मेडीटेशनमुळे कितीही मोठा आजार असला तरी आपण त्यातून मार्ग काढू शकतो, असा संदेश आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक मनोज इंगोले यांनी आणि त्यांच्या टीमने विद्यार्थ्याना दिला.
मेडीटेशन हे जीवनाला वेगळे वळण देतात
ते शिक्षण उपसंचालक अमरावती (Amravati) विभाग अमरावती अंतर्गत मा सु पा महाविद्यालया तर्फे आयोजित रा. से. यो. – २ शिबिरात दि. १५ जानेवारी रोजी बोलत होते. पुढे विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना इंगोले म्हणाले की, जीवनात हरल्यावर मरणाचा मार्ग स्विकारणारे लोकही नव्या जोमाने मेडीटेशनमुळे (meditation) जीवन जगायला लागतात. यासह विविध जीवनातील चढ उतराचे सविस्तर उदाहरण देवून विद्यार्थ्याना मंत्रमुग्ध केले. तसेच त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगची क्लास महाविद्यालयात घेण्याची यावेळी प्राचार्य डॉ नंदकिशोर ठाकरे यांना विनंती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा कु. सिमा भलावी यांनी तर संचालन वाघमारे यांनी केले.