‘2 दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार’
नवी दिल्ली (Arvind Kejriwal Resign) : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा केली. आपण प्रामाणिक मुख्यमंत्री आहोत, असे जनतेला वाटत असेल तर त्यांना नक्कीच मते मिळतील, असे सीएम केजरीवाल यांनी म्हटले आहे. आता जोपर्यंत दिल्लीची जनता निकाल देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे (Arvind Kejriwal) सीएम केजरीवाल म्हणाले. “आजपासून 2 दिवसांनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन.” मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज रविवारी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ही घोषणा केली.
मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, “आज मी तुमच्या कोर्टात आहे. मला तुम्हाला विचारायचे आहे की, तुम्ही मला प्रामाणिक मानता की नाही. तुम्हीच सांगा केजरीवाल प्रामाणिक की गुन्हेगार? मित्रांनो, दोन दिवसांनी मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. आणि जोपर्यंत जनता केजरीवाल प्रामाणिक असल्याचा निकाल देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.
आज मैं जनता से पूछने आया हूँ कि आप केजरीवाल को ईमानदार मानते हो या गुनाहगार
अब जब तक दिल्ली की जनता अपना फ़ैसला नहीं सुना देती है तब तक मैं CM की कुर्सी पर नहीं बैठूँगा।
मैं आज से 2 दिन बाद मुख्यमंत्री के पद से इस्तीफ़ा दे दूंगा। @ArvindKejriwal #केजरीवाल_ईमानदार_है pic.twitter.com/i59f5U9gVV
— AAP (@AamAadmiParty) September 15, 2024
सीएम केजरीवाल यांनी तुरुंगातून राजीनामा का दिला नाही?
सीएम केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, “मी तुरुंगातून राजीनामा दिला नाही, कारण मला देशाची लोकशाही मजबूत करायची होती. तुरुंगातूनही सरकार चालवता येते, हे मी आता सिद्ध केले आहे. आपल्या सर्वांवर देवाचा मोठा आशीर्वाद आहे. म्हणूनच आपण मोठ्या समस्यांशी लढतो आणि विजयी होऊन बाहेर पडतो. यासह मी लाखो लोकांचे आभार मानतो, ज्यांनी आमच्या साथीदारांसाठी प्रार्थना केली.
‘मी प्रामाणिक असेल तर मला मोठ्या संख्येने मतदान करा’
अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, “जर तुम्हाला वाटत असेल की, मी प्रामाणिक आहे, तर मला मोठ्या संख्येने मतदान करा. आता निवडून आल्यानंतरच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीसोबत दिल्लीतही निवडणुका व्हाव्यात, अशी माझी मागणी आहे.
मनीष सिसोदिया दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री होणार नाहीत
जनतेच्या दरबारातून निवडून आल्यानंतरच उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्रीपदही सांभाळणार असल्याचंही (Manish Sisodia) मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. याचा अर्थ मनीष सिसोदिया हे देखील दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री होणार नाहीत, असा स्पष्ट अर्थ आहे. माहितीनुसार दिल्लीचे मुख्यमंत्री हे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल होऊ शकतात. मात्र, आतिशी मार्लेना, राघव चड्ढा आणि संजय सिंह यांचीही नावे यादीत आहेत.