स्वाती मालिवाल यांच्या संवेदनशील अवयवांवरही केला हल्ला
एफआयआर मध्ये झाला मोठा खुलासा
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार स्वाती मालीवाल यांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला. पोलिस सूत्रांनी सांगितले की त्यांच्यावर शारीरिक हल्ला करण्यात आला. अनेक वेळा मारहाण करण्यात आली आणि शरीराच्या “संवेदनशील अवयवांवर” हल्ला करण्यात आला. विभव कुमारने तिला थापडा मारल्या, पोटात लाथ मारली, काठीने मारहाण केली असे तक्रारीत तपशील असल्याचे सूत्रांनी सांगितले.
39 वर्षीय राज्यसभा खासदाराने दावा केला की सोमवारी जेव्हा कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा तिने त्यांना सोडण्याचे आर्जव केले. बाहेर आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले.
आज, मालिवाल यांच्या तक्रारीनंतर, दिल्ली पोलिसांनी महिलेचा विनयभंग, गुन्हेगारी धमकी, शब्द आणि हावभाव किंवा महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्याच्या हेतूने आणि स्वेच्छेने दुखापत केल्याच्या आरोपाखाली अरविंद केजरीवाल यांचा पीए विभव कुमार याच्या विरुद्ध एफआयआर नोंदवला. अतिरिक्त पोलिस आयुक्त (एसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने मालीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे जबाब नोंदवले. तपास पथक राज्यसभेच्या खासदार स्वाती पालीवाल यांचे सुमारे ४ तास चौकशी करीत होते.
माझ्यासोबत घडलेल्या घटनेबाबत मी माझे म्हणणे पोलिसांना दिले आहे. मला आशा आहे की योग्य कारवाई केली जाईल, असे मालीवाल यांनी सांगितले आहे.