पुसद (Yawatmal) :- दीपावली सण भाऊबीज च्या पार्श्वभूमीवर बाहेर जाऊन येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवासी कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने बस स्थानकात (Bus Stand)प्रवासी कुटुंबांची मोठी हेळसांड होताना दिसत आहे. अगोदरच पुसद आगारांमध्ये एसटी बसेस ची संख्या अपुरी आहे. इतर आगारांमध्ये काही प्रमाणात नवीन एसटी बसेस उपलब्ध झाल्या.
सर्वसामान्य प्रवासी बांधव आर्थिक दृष्ट्या त्रस्त
मात्र पुसदाराला अजून मिळाल्या नाहीत. बाहेर गावावरून येणाऱ्या एसटी बसेसची संख्या कमी असल्यामुळे व प्रवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बस स्थानकात एकच गोंधळ उडत आहे . तर एखादी बसेस दोन दोन चार चार तासांनंतर नंतर बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर लागत असल्यामुळे मध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवासी एकच गोंधळ करीत आहेत. यामध्ये चोरट्यांना चोरी करण्याची चांगली संधी उपलब्ध होत असल्याचे दिसत आहे. प्रवासी बांधवांनी सुद्धा कुटुंबासह प्रवास करीत असताना बस प्लॅटफॉर्मवर (Platform) लागल्यानंतर गर्दीमध्ये चढताना काळजी घ्यावी. एस टी महामंडळांनी वेळेवर पुसद आगारात अशी संख्या कशी वाढेल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. बस स्थानकात बसेस अपुरे पडत असल्यामुळे कंटाळून प्रवासी बांधव खाजगी ट्रॅव्हल्स कडे वळले आहेत. लांब पल्ल्याच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर याकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चे भाडे सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी बांधव आर्थिक दृष्ट्या त्रस्त झालेला आहे.
मुंबई पुणे नाशिक कडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चे भाडे 2500 ते 3000 च्या वर पोहोचले आहे. मात्र एसटी बसेस मध्ये वेळेवर जागा मिळत नाही व एसटी बसेस वेळेवर लागत नाही. यामुळे प्रवासी बांधव खाजगी ट्रॅव्हल्स कडे वळले आहेतहे विशेष.