पहिल्या दिवशी बोलाविलेल्या ७५० पैकी ४८५ उमेदवारांनी दर्शविली उपस्थिती
हिंगोली (Hingoli Police Bharti) : जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या ६४ जागाकरीता ११ फेब्रुवारी पासुन भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ७५० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. प्रत्यक्षात ४८५ उमेदवार मैदानावर उपस्थित झाले तर २७५ उमेदवार गैरहजर राहिले.
हिंगोलीतील संत नामदेव पोलीस कवायत मैदनावर ११ फेब्रुवारी पासुन (Hingoli Police Bharti) भरतीची प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. ही भरती प्रक्रिया आधुनिक आरएफ आरडी सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात येत आहे. बुधवारी ७५० उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. पहाटे ४.३० वाजल्यापासुन उमेदवारांना मैदानावर सोडण्यात आले.

प्रत्यक्षात ४८५ उमेदवार उपस्थित राहिले. या (Hingoli Police Bharti) उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी त्यानंतर शाररीक चाचणी व मैदानी चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये धावणे, गोळा फेक आदी बाबींचा समावेश आहे. प्रत्येक छावण्यामध्ये अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक बाबीवर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधिक्षक कमलेश मिना यांचे बारकाईने लक्ष होते. आज १२ फेब्रुवारी रोजीही ७५० उमेदवारांना बोलाविले आहे.




