कोरेगाव चोप (Gadchiroli):- देसाईगंज तालुक्यातील अनेक घरकुलांचे कामे रेती नसल्याने रखडलेले आहेत ,त्यामुळे घरकुल धारकांची तारांबळ उडाली आहे. अवैध रेती तस्करी (Illegal sand smuggling) वर बराच वचप बसलेला आहे नदी घाट चालु झाले नाही.
खड्डे खोदले पण रेती अभावी कामे रखडले
शासनाकडुन घरकुल मिळाले खरे पण, विनारेतीने पक्के बांधकाम (Construction) करायचे कसे बर्याचशा घरकुल धारकांनी खड्डे खोदले पण रेती अभावी कामे रखडले आहेत, तर शासनाकडून शहरी ग्रामीण अशा भेदा मुळे अडचणीत वाढ झाली आहे. सर्व साहित्य हे शहरी भागातुनच घ्यावे लागते त्यात वाहतुक खर्च वाढल्याने ग्रामीण भागातील घरकुलधारकांचे कंबरडे मोडलेले आहे, तरी ऑनलाईन मागणी कलेल्या व विना आनलाईन केलेल्या घरकुल धारंकांना तात्काळ रेतीचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
घरकुलधारंका दिड लाख ,तर शहरी भागासाठी अडिचलाख का?
अवघ्या एका महिन्यावर पावसाळा येवुन ठेपला आहे, शेतकर्यांचे शेती कामे करायची की घरकुल आल्याने रहाते घरे पाडली असुन राहण्याची शोय करावी की शेताची खरीपा पुर्वीची मशागत करावी असाही प्रश्न निर्माण झाला आहे, तर वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील घरकुलधारंका दिड लाख ,तर शहरी भागासाठी अडिचलाख का? हाही सवाल उपस्थित केला जात असुन ग्रामीण भागातील घरकुल धारक जनतेच्या मागणी कडे शासनाने लक्ष पुरवुन 5 ब्रास रेती, व घरकुल बांधकामासाठी शहरी भागायवठीच अडीच लाख रुपये वाठवुन द्यावे असे सर्वसामान्य जनतेची ही मागणी होत आहे.