नवी दिल्ली (New Delhi):- सनरायझर्स हैदराबादविरुद्ध(Sunrisers Hyderabad) 51 धावांची इनिंग खेळल्यानंतर विराट कोहलीने(Virat Kohli) ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपली आघाडी मजबूत केली आहे. या यादीत किंग कोहली 9 सामन्यात 430 धावांसह अव्वल स्थानावर आहे. आयपीएल 2024 मध्ये 400 धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. या धावा विराटच्या बॅटने 61.43 च्या सरासरीने आणि 145.76 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. या टॉप-5 फलंदाजांच्या यादीत समाविष्ट असलेल्या इतर फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. रुतुराज गायकवाड(Ruturaj Gaikwad) 349 धावांसह दुसऱ्या, ऋषभ पंत(Rishabh Pant) 342 धावांसह तिसऱ्या, साई सुदर्शन 334 धावांसह चौथ्या आणि ट्रॅव्हिस हेड 325 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
पर्पल कॅपबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी प्रथमच सर्व भारतीयांचा टॉप-5 गोलंदाजांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीत जसप्रीत बुमराह(Jasprit Bumrah) 13 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेलही तितक्याच विकेटसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय कुलदीप यादव आणि टी नटराजन 12-12 विकेट्ससह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने या सामन्यात एक विकेट घेतली, तर तो या यादीत 10 विकेटसह 11व्या स्थानावर पोहोचला आहे