अंचरवाडी येथील स्वप्नपूर्ती ज्युनियर कॉलेजच्या वतीने दिंडी सोहळा
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Ashadhi Ekadashi) : आषाढी एकादशी दिनानिमित्त (Ashadhi Ekadashi) अंचरवाडी स्वप्नपूर्ती स्कूल न्यु कॉलेज च्या वतीने संपुर्ण गावातून दिंडी सोहळा काढला या सोहळ्यात शाळेच्या विद्यार्थांनी वेगवेगळ्या वेशभूषा कपडे परिधान करून गावकऱ्यांना आकर्षित केले.
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी (Ashadhi Ekadashi) आषाढी एकादशी सोहळा असतो. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरला पायी जातात व चंद्रभागेत स्नान करून विठलाचे दर्शन घेतात हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वशिला जाणारे वारकरी हे समूदायातून म्हणजेच एकाग्रतेचे प्रतिक म्हणून सहभागी होतात तसेच पंढरपूर पायी जान्याची परंपरा ही फार जुनी असून भक्ताची श्रद्धा वारीशी जुळलेली आहे.
विद्यार्थांनी विविध वेशभूषा घेवून गावकऱ्यांना केले आकर्षित
खऱ्या अर्थाने पंढरपूर वारीची परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वशिला सुरुवात झाली यात विविध जातीपातीचे लोक सहभागी होतातः लोभापासून विभक्त असलेला घटक म्हणते वारकरी, यासह पायी दिंडीतून जनजागृतीव्दारे विध्यार्थी मनावर सांप्रदायीक बाबी प्रतिबिंबीत करण्याचे कार्य दिंडी सोहळयातून स्वप्नपूर्ती स्कूल ने केले. विद्यार्थी यांनी विठ्ठल रूखमाईच्या आकर्षक वेशभूषा परिधान करून संपूर्ण गावातून विद्यार्थी विठ्ठल नामाच्या बरोबरच विविध जनजागृती करतांना वृक्षारोपण मुलांना शिका गुणवत्तापूर्ण उच्चशिक्षण दयावे असा संदेश देण्यात आला. या (Ashadhi Ekadashi) दिंडीत सर्व पालक व गावकरी भोती देखील सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष एकनाथराव परिहार, शाळेच्या प्राचार्या सौ गाताडे मॅडम सर्व शिक्षक शिक्षका, कर्मचारी यांनी मेहनत घेतली. संख्येचे सचिव समाधान परिहार व कोषाध्यक्ष रविंद्र परिहार यांनी मार्गदर्शन केले.