‘अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर!!
पुसद (Pandharpur yatra) : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) स्थानिक जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलची दि.17 जुलै रोजी अत्यंत देखणी पायी दिंडी व वारीचे आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठल नामाचा गजर करत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, हातात टाळ मृदंग आणि भगवे झेंडे घेऊन बियाणी ले-आउट पासून स्व.वसंतराव नाईक चौकापर्यंत विठ्ठल नामाचा गजर करत वारी पोहोचली. या ठिकाणी पुसद शहर पोलीस स्टेशनचे उमेश बेसरकर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमोल मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आला.
जेट किड्स इंटरनॅशनल विद्यालयाची वारी
या दिंडीला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरूद्ध पाटील, युवक मंडळ, पुसद चे अध्यक्ष, विजय जाधव, लोकहित संस्थेचे अध्यक्ष महेश खडसे, आय.एम. ए. पुसद चे अध्यक्ष डाॅ. तुषार देशपांडे यांच्यासह सेता कोचिंग क्लासेसचे संचालक तुषार सेता, हिरानी ड्रेसेसचे संचालक सिराज हिराणी हे उपस्थित होते. शहरचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर , ठाणेदार वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील तसेच वाहतुक शाखेचे ठाणेदार हे उपस्थित होते. या ठिकाणी वर्ग ४ व ५ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट दिंडी नृत्य सादर केले. यामध्ये दिंडीत वर्ग ४ व ५ वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पुढे (Pandharpur yatra) दिंडीची वाटचाल कारला रोडवरील जिजामाता मंगल कार्यालयापासून विठ्ठल मंदिरापर्यंत टाळ व मृदंगाच्या गजरात ‘जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल’ अशा घोषणा देत चिमुकल्यांची वारी निघाली.
वारी विठ्ठल मंदिरासमोर (Vitthal Mandir) आली तेथे पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. इंद्रनील नाईक व एड. सामाजिक कार्यकर्त्या सौ.मोहिनीताई नाईक यांनी वारीला भेट दिली. त्यांचा सत्कार डॉ. अमोल मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आला. व सौ. मोहिनीताई नाईक यांचा सत्कार आमच्या शाळेच्या सचिव डॉ.अस्मिता मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर विठ्ठल मंदिर संस्थानाकडून आ. इंद्रनील नाईक व सौ.मोहिनीताई नाईक तसेच डॉ.श्री.अमोल मालपाणी व डॉ.सौ.अस्मिता मालपाणी यांचा सत्कार करण्यात आला.वारीचे वैशिष्ट्य म्हणजे वारीमध्ये ‘झाडे लावा ,झाडे जगवा’, ‘नसते वृक्ष तर जीवन होईल रूक्ष’,असे घोषणा फलक हातात घेऊन विद्यार्थी जनजागृती करीत होते.
सर्व वातावरण अगदी भक्तीमय झाले होते. या दिंडीचे व कार्यक्रमाचे संचलन .कु.स्वरा खके व कु.किमया पदमवार तसेच चि.सार्थक लव्हाळे कु.सानवी चि.अभिराज व अश्वजीत कंकाळ या सर्व विद्यार्थ्यांनी करून वारीची शोभा वाढवली हे विशेष. या (Pandharpur yatra) कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जेट्स किड्स शाळेचे अध्यक्ष डॉ. अमोल मालपाणी व सचिव डॉ. अस्मिता मालपाणी तसेच जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका के.जी.मिनी.कुरुप यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शाळेचे कॉर्डिनेटर्स साधना दुबे, बलवंत मोटे, निलेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. (Ashadhi Ekadashi) आषाढी एकादशी निमित्तत निघालेल्या या रॅलीने पुसदकरांचे मन जिंकले तर या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात शाळेतील विद्यार्थ्यांची पालक आई वडील व इत्यादी नातेवाईक सहभागी झालेली दिसत होते यांच्यासह पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी महिला कर्मचारी अधिकारी शहर पोलीस स्टेशन व वसंत नगर पोलीस स्टेशनचे डीबी पथक उपस्थित होते हे विशेष.