हिंगोली (Ashadhi Ekadashi) : संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या (Namdev Maharaj) जन्मगावी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त लाखो भाविकांची गर्दी बुधवारी झाली होती. त्यामुळे जणूकाही पंढरीच अवतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीकोणातून अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील ह्या दिवसभर मंदीर परिसरात तळ ठोकून बसल्या होत्या.
१७ जुलै रोजी नर्सी ना. येथे थोर संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या (Namdev Maharaj) समाधीचे दर्शन घेण्याकरीता भाविकांची मोठी गर्दी झाली होती. (Ashadhi Ekadashi) यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी श्रीच्या वस्त्र समाधीची सकाळी ७ वाजता शासकीय महापूजा केली. यावेळी संस्थानचे मनोज आखरे, द्वारकादास सारडा, डॉ. रमेश शिंदे केसापुरकर, भिकाजी किर्तनकार, बद्रीनाथ घोंगडे आदी पदाधिकार्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बद्रीनाथ सानप आदी उपस्थित होते. त्यानंतर हे मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
आलेल्या भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या (Namdev Maharaj) समाधीसह पांडूरंग-रूख्मिनीचे दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची एकसारखी गर्दी चालू होती. आलेल्या भाविकांना माणिकराव लोडे यांच्यावतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. (Ashadhi Ekadashi) तसेच काळकुंड येथील मित्र मंडळाच्यावतीने भाविकांची पादत्राणे ठेवण्यासाठी स्टॉल लावण्यात आले होते. श्री संत नामदेव महाराजांचे दर्शन घेण्याकरीता मंदीर परिसरातील जवळपास अर्धा किलोमिटर पर्यंत भाविकांची लांबच लांब रांग होती.
दर्शनाकरीता वैजापूर, हळदवाडी, केसापूर, काळकोंडी, आम्ला, गिलोरी, इडोळी, कडती, हनवतखेडा, देऊळगाव जहॉगीर, पुसेगाव, तळणी, सवड, सरकळी, नांदूरा, लोहगाव, घोटादेवी, दाटेगाव, करंजाळा, ब्रम्हपुरी, वरूड, उमरा, डिग्रस कर्हाळे यासह पंचक्रोशितील भाविक उपस्थित होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सी नामदेव ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.के.सानप, अरूण नागरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिरा जवळ अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय थाटले होते. विशेष म्हणजे दिवसभर पावसाची उघडीप असल्याने (Ashadhi Ekadashi) भाविकांना सुलभ दर्शन घेता आले. सायंकाळ पर्यंत भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. त्यामुळे मंदीर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.