आता होणार नि:शुल्क नॉर्मल डिलिव्हरी व सिझेरियन
नागपूर (Ashish Deshmukh) : भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी, माजी आमदार व लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूरचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. आशीष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी रक्षाबंधनानिमित्त (Raksha Bandhan) सर्व लाडक्या बहिणींसाठी लता मंगेशकर मातृत्व योजना (Lata Mangeshkar Maternity Yojana) आणली आहे. या योजनेंतर्गत लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर येथे भरती असलेल्या गर्भवती भगिनींची नि:शुल्क नॉर्मल डिलिव्हरी व नि:शुल्क सिझेरियन डिलिव्हरी करण्यात येणार आहे.
सोबतच, भरती गर्भवती भगिनींच्या सर्व तपासण्या व औषधी मोफत राहणार असून दररोज दोन वेळा जेवण व चहा-नाश्त्याची नि:शुल्क सोय करण्यात आलेली आहे. ओपीडीमध्येसुद्धा गर्भवती भगिनींच्या सर्व तपासण्या, औषध व सल्ला मोफत राहणार असून गर्भवती बहिणींचा (Free normal delivery) डिलिव्हरी होईपर्यंत सर्व उपचार व औषध मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निःशुल्क मातृत्व योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा’, असे आवाहन डॉ. आशीष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केले.
आज रविवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, काटोल येथे (Raksha Bandhan) रक्षाबंधन दिनानिमित्त आयोजित भगिनींच्या मनोमीलन कार्यक्रमात डॉ. आशीष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी ही घोषणा केली. महिलांचा सन्मान व त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने महायुती सरकारच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून लता मंगेशकर मातृत्व योजना (Lata Mangeshkar Maternity Yojana) सुरू केली आहे. त्यांच्या या योजनेचे कार्यक्रमाला उपस्थित हजारो भगिनींनी स्वागत केले आणि त्यांना राख्यासुध्दा बांधल्या.