आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) हे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करतात म्हणुनच त्यांना जनतेने चार वेळा निवडूण दिले. आशिष जयस्वाल हे राज्यात सूरू असलेल्या अनेक लोककल्याणकारी योजना कशा असाव्या याची आखणी व त्या संबंधीचे जीआर काढुन घेणारा एकमेव अभ्यासू आमदार आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जयस्वाल यांची स्तृती केली. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी यासाठी जयस्वाल हे आग्रही आहेत. धानाला 15 हजार ऐवजी 20 हजार बोनस जाहिर झाला यामध्ये जयस्वाल यांची भुमीका महत्वाची आहे असेही मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले.
रामटेक विधानसभा क्षेत्रात (Ramtek Assembly Election) 64 बौध्द विहार मंजुर करण्यात आले असुन लवकरच त्यांच्या बांधकामाला सुरूवात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, संविधान जर जीवन का मंत्र है तर राहुल गांधी विदेशात बसुन आरक्षण बंद करण्याची भाषा का बोलतात? काँग्रेसला 70 वर्षात संविधान दिन साजरा करता आला नाही, तो 2015 पासुन नरेंद्र मोदी यांच्या काळात साजरा करणे सुरू झाले. नरेंद्र मोदी हे संविधानानुसार काम करतात, त्यांच्या नेतृत्वात देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे. देशात व राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे त्यामुळे डबल गॅरंटी आहे.
लाडकी बहिण योजना (CM Ladki Bahin Yojana) बंद करायचा व आम्हाला निवडुण आल्यावर जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या काँग्रेसवाले देतात. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. लाडक्या बहिणींसाठी एकवेळा नाही शंभर वेळा हा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जेलमध्ये जाण्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसवाल्यांनी या योजनेला विरोध केला आता त्यांना या योजने विषयी बोलण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. येत्या काळात शेतकरी कर्ज माफ, शेतकरी सम्मान योजना 12 हजार ऐवजी 15 हजार रू देणार, वृध्दांना 1500 ऐवजी 2000 देवू. आम्ही जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवले, 45 हजार गावांत पांधन रस्ते पुर्ण केले, अंगणवाडी सेविकांचे मानधन 15 हजार रू केले. विरोधकांच्या राज्यात जलयुक्त शिवार योजना, समृध्दी योजना बंद, सण उत्सव बंद मंदिरे बंद होती. कोविड काळात केवळ भष्टाचार सुरु होता. आम्ही घेणारे नाही तर देणारे असल्याचे ते म्हणाले.