नांदेड (Ashok Chavan) : शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth highway) नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. याविरोधात मंगळवारी नांदेड मधील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहे. यावेळी खासदार आशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांनी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांची भेट घेवून शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी खासदार अशोकराव चव्हण यांच्याशी बातचीत केली असता खासदार चव्हाण म्हणाले की,शक्तीपीठ महामार्गाला जनतेचा विरोध आहे आणि म्हणून लोकांची सहमती घेतल्याशिवाय काही करू नये, असे माझे मत आहे, ते रद्द व्हावा, अशी मागणी मी पण केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याचे खासदार अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले आहे.