परभणी (Parbhani) :- शासकीय रेशन दुकानदाराला तुम्ही मला राशन का देत नाही, अशी विचारणा केल्यावर संबंधितांनी तुला राशन देणार नाही, काय करायचे ते कर असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करुन जबर मारहाण केली. ही घटना परभणी तालुक्यातील वैâलासवाडी येथे अंगणवाडी जवळील सार्वजनिक रस्त्यावर घडली. या प्रकरणी ५ सप्टेंबर रोजी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीला लोखंडी रॉडने, दगडाने मारुन गंभीर केले जखमी
राजेभाऊ पवार यांनी तक्रार (Complaint) दिली आहे. फिर्यादीने गावातील सरकारी रेशन दुकानदाराकडे रेशनची मागणी केल्यावर तु आमच्या घरी राशन घ्यायला यायचे नाही, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. शिवीगाळ करु नका, असे म्हणाल्यावर आरोपींनी फिर्यादीला तु खुप माजलास का, असे म्हणत लोखंडी रॉडने, दगडाने मारुन गंभीर जखमी केले. जीवे मारण्याची धमकी दिली. जखमीला उपचारासाठी दैठणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढे परभणीला पाठविण्यात आले. या प्रकरणी अर्जून कौळासे, पांडू कौळासे, सुधाकर कौळासे, पद्माकर कौळासे, हरीभाऊ कौळासे, विठ्ठलराव कौळासे, बाळू कौळासे, मुरली कौळासे, किशन कौळासे, नंदराज कौळासे, कमलाकर कौळासे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत.