Washim:- इस्कॉन दिल्लीच्या वतीने पर्यावरण मंत्रालय आणि संयुक्तराष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या सहकार्याने आयोजित ‘इंटरनॅशनल व्हॅल्यू एज्युकेशन ओलंपियाड’ या परीक्षा अंतर्गत भारतातून तिसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल लायसीयम स्कुल रिसोड ची इयत्ता आठवीची विद्यार्थीनी कु. आकांक्षा रवींद्र देशमुख हिला ई-बाईक चा पुरस्कार मिळाला.
शाळेच्या वतीने कु. आकांक्षा सत्कार समारंभ आयोजित
केंद्रीय पर्यावरण मंत्री (environment minister)भूपेंद्र यादव, उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री संदीप सिंह, सीबीआय आयुक्त आणि इस्कॉन दिल्लीचे प्रमुख यांच्या हस्ते सदर पुरस्कार कु. आकांक्षा रवींद्र देशमुख हिला प्रदान करण्यात आला. आकांक्षा देशमुख हिच्या या यशाबद्दल लायसीयम शाळेच्या वतीने तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. विधान परिषदेच्या (legislative council) आमदार आणि संस्था अध्यक्षा भावनाताई गवळी यांनी आकांक्षाचे मोबाईलव्दारे अभिनंदन केले असून यावेळी लायसीयम शाळेच्या संचालीका साधनाताई गवळी, मुख्याध्यापिका एकता राजपूत यांनी आकांक्षा हिचा यावेळी प्रत्यक्ष सत्कार केला. आकांक्षा देशमुख हिचे यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.