दिसपूर (Assam Flood) : आसाममधील पूरस्थितीत अंशत: सुधारणा झाली आहे. अनेक भागांमध्ये पुराचे पाणी कमी होत आहे, परंतु 18 जिल्ह्यांमध्ये कचार, नलबारी, कामरूप, गोलाघाट, मोरीगाव, चिरांग, दिब्रुगड, धुबरी, गोलपारा, नागाव, करीमगंज, कामरूप (एम), धेमाजी, माजुली, दररंग, शिवसागर, जोरहाट, विश्वनाथमधील सुमारे 5.98 लाख लोक अजूनही पुरामुळे त्रस्त आहेत. येथे CLICK करा : गेल्या 36 तासांत जनजीवन विस्कळीत, घरे उद्ध्वस्त
माहितीनुसार, 52 महसूल मंडळांतर्गत 1342 गावे अजूनही पाण्याखाली आहेत आणि 25367.61 हेक्टर पीक क्षेत्र पुराच्या पाण्यात बुडाले आहे. (Assam Flood) नेमाटीघाट, तेजपूर आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हावर पोहोचली आहे. 13 जिल्ह्यांतील 172 मदत छावण्या आणि वितरण केंद्रांमध्ये 58,000 हून अधिक लोक अजूनही आश्रय घेत आहेत. 283712 पाळीव प्राण्यांनाही (heavy rain) पुराचा फटका बसला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रशासन 13 जिल्ह्यांमध्ये 172 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवत आहे. (Assam Flood) सध्या 58,816 विस्थापित लोकांना मदत करत आहे. गेल्या 24 तासांत अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना 594.48 क्विंटल तांदूळ, 110.95 क्विंटल डाळी, 28.82 क्विंटल मीठ आणि 2,580.04 लिटर मोहरीचे तेल वाटप केले आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आसाममधील पूरस्थितीत सोमवारी लक्षणीय सुधारणा झाली, कारण आसामच्या विविध भागांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. गुवाहाटी येथील (IMD) भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) बराक खोरे आणि (Assam Flood) मध्य आसाममधील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या (heavy rain) अंदाजाशिवाय कोणताही इशारा जारी केलेला नाही.