अर्जुनी/मोरगाव (Assembly Constituency Election) : नुकतेच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले दमदार आणि कार्यकुशल नेतृत्व असलेले (Dr. Ajay Lanjewar) डॉ. अजय संभाजी लांजेवार यांनी आज नवेगाव/बांध येथे पत्रकार परिषद घेतली. अर्जुनी/मोरगाव विधानसभेच्या गेल्या पंधरा वर्षांपासून राखीव असलेल्या मतदार संघाच्या विकासाबाबत व विकासा करिता आज पर्यंत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी काय केलं? याबाबत डॉ. अजय लांजेवार यांनी विधानसभा क्षेत्रा बाबत अनेक समस्यांचा पाढा वाचला. त्यात प्रामुख्याने अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या दाहा दिवसापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे झालेल्या पूर पावसाच्या नुकसानीबाबत शासन व प्रशासन किती गाढ झोपेत असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये निदर्शनात आणून दिले.
त्यात प्रामुख्याने अनेक शेतकऱ्यांची शेती अधिक पाऊसामुळे पाण्याखाली आल्याने पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांवर दुबार रोवणीची वेळ आली .अशा हालाखीच्या परिस्थित शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.परंतु शासनाकडून अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. पूर परिस्थितीमुळे सततच्या पावसाने अनेकांची घरे पडलेली आहेत.आणि पडत आहेत. तेही मदतीपासून वंचित आहेत.याकडे अजून पर्यंत कोणत्याही (Assembly Election) लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याचे दिसून नाही. त्याचप्रमाणे अर्जुनी/मोरगाव विधानसभा मध्ये निसर्गाच्या वनसंपदेने सज्जलेल नवेगाव/ बांध हे महाराष्ट्राच्या नकाशावर राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित असून सुद्धा, याकडे गेल्या पंधरा वर्षापासून दुर्लक्ष केलेले आहे.
लोकप्रतिनिधींनी पर्यटनाला चालना दिली असती तर नवेगाव/बांध,अर्जुनी/मोरगाव परिसरातील अनेक नागरिकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली असती. एकंदरीत याकडे निवडून आलेले जनप्रतिनिधींची पाठ फिरवली असे जनतेचे मत आहे. त्यामुळे या विधानसभेतील अनेक आरोग्याच्या समस्या, शिक्षणाच्या समस्या रोजगारांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत.मागील पंधरा वर्षापासून मी अर्जुनी/मोरगाव विधानसभेमध्ये (Assembly Election) आपल्या सर्वांच्या सहकार्यांने जनतेची सेवा युवक युवतींना रोजगाराची संधी प्राप्त होय म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये युवकांना प्रशिक्षण देऊन अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून आरोग्य क्षेत्रात मुलींना संधी प्राप्त आहे म्हणून नर्सिंग चे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
आज त्या अनेक मुली मोठ्या शहरांमध्ये स्वतःच्या पायावर उभ्या असून मोठ्या शहरांमध्ये आरोग्य सेवा देत आहेत. माझ्याकडून जे शक्य होईल ते प्रयत्न मी मागील पंधरा वर्षांपासून या परिसरामध्ये मदतकार्य व सामाजिक सेवा करीत आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात शुद्धा नागरिकांना मदत करुन त्यांचे जीव वाचविले आहे. त्यामुळे येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election) विचार करता अर्जुनी/मोरगाव विधानसभेच्या जनतेने एक जनमानस तयार केलेला आहे की,”विकास हवा तर,चेहरा नवा”या आशियाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून या विधानसभेच्या विकासाकरिता प्रयत्न करीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या म्हणण्याप्रमाणे” जोपर्यंत आपण सत्तेत जाणार नाही तोपर्यंत आपल्या परिसराचा विकास करता येणार नाही”म्हणून जनतेच्या आशीर्वादाने जर मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यास मी अर्जुनी/मोरगाव विधानसभेची निवडणूक (Assembly Election) लढविणार व जिंकून येणार व नक्कीच या विधानसभेच्या विकासासाठी मी जनतेच्या आशीर्वादाने अहोरात्र प्रयत्न करून अर्जुनी/मोरगाव विधानसभेचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही.
जरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी पण बहुजनांचे नेते कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले (MLA Nana Patole) यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री बनविण्याकरिता व पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता, पक्ष वाढविण्याकरिता पक्ष हित जोपासुन अहोरात्र कार्य करीत राहीन, असे मत कॉंग्रेस नेते डॉ. अजय लांजेवार (Dr. Ajay Lanjewar) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आजच्या मराठी पत्रकार संघाच्या पत्र परिषदेत त्यांच्या समवेत शंकरभाऊ मेंढे, मदन कोटांगले, प्रदीप सहारे, देवचंद शिवणकर, दिपक वैद्य, डॉ. शांमकात नेवारे, हरिश कोहळे, इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच अर्जुनी/मोरगाव तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य गण उपस्थित होते.