नवी दिल्ली ( Assembly election 2024) : भारतीय जनता पक्षाने (BJP) जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने आपल्या पहिल्या यादीत 44 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. (Jammu and Kashmir Assembly) जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 2014 नंतर निवडणुका होणार आहेत.
भाजपने राजपोरामधून अर्शीद भट, शोपियानमधून जावेद अहमद कादरी, अनंतनाग पश्चिममधून मोहम्मद रफिक वानी, अनंतनागमधून वकील सय्यद वजाहत, किश्तवाडमधून सुश्री शगुन परिहार आणि दोडामधून गजयसिंह राणा यांना उमेदवारी दिली आहे. शगुन परिहार या भाजपच्या महिला उमेदवार आहेत. पक्षाने रियासीमधून कुलदीप राज दुबे, श्री माता वैष्णोदेवी येथून रोहित दुबे, पूँछ हवेलीतून चौधरी अब्दुल गनी, उधमपूर पश्चिममधून पवन गुप्ता, रामगढ (एससी)मधून डॉ. देविंदर कुमार मनियाल आणि अखनूरमधून मोहन लाल भगत यांना (Assembly election 2024) निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली आहे.
BJP announces list of candidates for the upcoming Jammu and Kashmir Assembly elections. (n/1)#JammuKashmirElections pic.twitter.com/a9e2w7raLe
— Press Trust of India (@PTI_News) August 26, 2024
2 काश्मीर पंडितांना तिकीट, केंद्रीय मंत्र्याच्या भावालाही उमेदवारी
भाजपने काश्मीरच्या दोन पंडितांनाही तिकीट दिले आहे. वीर सराफ यांना शांगस-अनंतनाग पूर्व आणि अशोक भट्ट यांना हब्बाकडलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने नागोटामधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे भाऊ देवेंद्र राणा यांना उमेदवारी दिली आहे. देवेंद्र राणा यांनी नॅशनल कॉन्फरन्स सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी उपमुख्यमंत्र्यांना तिकीट नाही
या यादीत माजी उपमुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. निर्मल सिंह यांना तिकीट देण्यात आलेले नाही. याशिवाय माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांचेही तिकीट रद्द करण्यात आले आहे. मात्र, पुढील यादीत कविंदर गुप्ता यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. या यादीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. (Assembly election 2024) जम्मू आणि काश्मीर निवडणुकीत, भाजप कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही आणि काश्मीर खोऱ्यातील त्या विधानसभा जागांवर मजबूत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देईल, जिथे पक्ष लढणार नाही.
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या जागांची माहिती
जम्मू आणि काश्मीरमधील एकूण 90 विधानसभा मतदारसंघांपैकी 74 सर्वसाधारण, नऊ अनुसूचित जमाती आणि सात अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. (Election Commission) निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, केंद्रशासित प्रदेशात 87.09 लाख मतदार आहेत, ज्यामध्ये पुरुष आणि महिलांची टक्केवारी समान आहे.