पातूर (Assembly Election 2024) : प्रत्येक मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची धामधूम मोठ्या जोरात सुरू असून यामध्ये मतदारसंघात मात्तबर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, उमेदवारांच्या विजयावर व पराभवावर अनेकांचे राजकीय भविष्य अवलंबून आहेत. (Assembly Election 2024) विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सध्या धामधूम सुरू आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उमेदवारांचा जोरदार प्रचार करीत असताना दिसत आहेत.
विधानसभा आटोपल्यानंतर नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेचीसुद्धा निवडणूक (Assembly Election 2024) होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या जि.प. सर्कल, प.स.सर्कल ,न.प. प्रभागात मतांची किती आघाडी मिळणार यावर पदाधिकारी, इच्छुक कार्यकर्ते, माजी नगरसेवकांचे तिकीट फायनल होणार आहे. नगरपालिकेचा कार्यकाळ संपून अडीच वर्षांचा कालावधी झाला आहे. जिल्हा परिषदेचीही पाच वर्षांची मुदत संपत आहे. त्यामुळे जि.प. व प.समिती व नगर परिषद निवडणुकीचेही वेध लागलेले आहेत. विधानसभेची निवडणूक आटोपल्यावर या तिन्ही स्थानिक स्वायत्त संस्थांचीही निवडणूक जाहीर होण्याची लक्षात घेता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवकपदाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रचारास सुरुवात केली आहे. मताधिक्य मिळाले नाही, तर आपली उमेदवारीही धोक्यात येईल, ही भीती अनेकांना सतावू लागली आहे.
त्यामुळे गाव, तालुक्यासह जिल्हा पातळीवरील शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतःला झोकून देत प्रचार करीत आहेत. आपल्या सर्कल, प्रभागातून पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त लीड कसा देता येईल, याचा प्रयत्न अनेकांनी चालवला त्यासाठी सर्व जिवाचे रान करत आहेत. मतदारसंघ असून, यंदा बाळापुर पातूर 29 विधानसभा मतदारसंघात (Assembly Election 2024) मातब्बर आपले नशीब आजमावत आहेत. पक्षासह अपक्षांनीही कंबर कसली असून, प्रचार यंत्रणा सकाळपासून राबत आहे. आपल्याच पक्षाचा उमेदवार विजयी होणार, याचा दावाही विविध पक्षांचे कार्यकर्ते करत आहेत.
आपल्या आपल्या उमेदवारासोबत फिरताना कार्यकर्ते आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास उमेदवारांना देत असले तरी आगामी काळात होणाऱ्या (Assembly Election 2024) जि.प., प.स.व नगर पालिका निवडणुकीसाठी फिल्डिंग लावत आहेत. सर्कल, प्रभागात पक्षाच्या उमेदवारास जास्त मतदान झाल्यास, जि.प. प.स. नगरपालिका निवडणुकीत संधी मिळू शकते. या दृष्टिकोनातूनच पक्षाचे पदाधिकारी, माजी जि.प. प.स सदस्य, माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्तेही काम करीत असल्याचे दिसत आहे.
पक्षश्रेष्ठींच्या लक्षात येण्यासाठी इच्छुक दादाभाऊंचा आटापिटा:
मी घेतोय महिन्यात !सर्कल दाखवेल आपली मेहनत
यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मैदानात असून (Assembly Election 2024) विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचे विधानसभा जिल्हाप्रमुख, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस मतदारसंघ पदावर काम करणारे नेते, विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात आहेत. स्थानिक स्तरावर जिल्हा परिषद,नगरपालिका निवडणुकीतील तिकीट वाटपही त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे भाऊ, साहेबांच्या नजरेत येण्यासाठी, त्यांच्या मताधिक्यांसाठी आपण किती ताकद लावून काम करीत आहोत. हे दाखविण्याचा प्रयत्न जि.प. प.स नगरपालिका इच्छुक असलेल्यांकडून केला जात आहे.