हिंगोली (Assembly election) : येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. त्या निमित्ताने प्रशासनाकडून लगबग सुरू असताना क्षेत्रीय अधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या अनुषंगाने १६ ऑगस्टला हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणूक कामकाजानिमित्त क्षेत्रीय अधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय अधिकार्यांच्या नियुक्त्या लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १५९ अन्वये करण्यात आल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची कामे सुरळीत व मुदतीत पूर्ण होण्याच्या दृष्टीकोणातून तसेच कामात सचोटी कर्तव्य परायणता, पारदशर््क व नि:पक्षपाती धोरणाचे नियम अधिनियम आणि भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार दिलेली कर्तव्य पार पाडावी लागणार आहेत. त्यामुळे या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई केल्यास संबंधितावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कार्यवाही केली जाणार असल्याचा इशारा हिंगोली मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी दिला आहे. याच निमित्ताने १६ ऑगस्टला सकाळी ११ वाजता हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयात क्षेत्रीय अधिकार्यांची बैठक घेण्यात येणार आहे.
सोपविलेली कामे सचोटीने पार पाडावे-समाधान घुटूकडे
आगामी काळात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ज्यांना ज्यांना दिलेली कामे त्यांनी मुदतीत व सचोटीने पूर्ण करावे, कोणत्याही कामात दिरंगाई केल्यास संबंधितावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियमना अंर्तगत कार्यवाही करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी दिला आहे.