पण विधानसभा निवडणुकीत मतदार बळी पडणार नसल्याचा विश्वास!
बुलडाणा (Assembly elections) : संविधान बदलले जाणार, यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व अमित शाह यांच्याबद्दल अल्पसंख्यांक समाजात गैरविश्वासाचे वातावरण निर्माण करून विरोधकांनी लोकसभेत खोटे नॅरेटिव्ह सेट केले होते. तो खोटा अपप्रचार खोडून काढण्यात भाजपा कमी पडली, याची प्रांजळ कबुली देत मात्र येत्या विधानसभा निवडणूक अशा खोट्या अपप्रचाराला मतदार बळी पडणार नसलेला विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार चैनसुख संचेती (Chainsukh Sancheti) यांनी व्यक्त केला.
मलकापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले व प्रदेश भाजपाच्या संघटनात्मक पातळीवर कार्यरत असलेले चैनसुख संचेती (Chainsukh Sancheti) यांनी आज शुक्रवार 26 जुलै रोजी “दै. देशोन्नती”च्या बुलढाणा विभागीय कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी त्यांनी राज्यासह (Buldhana Assembly) बुलढाणा जिल्हा व मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणावर सविस्तर चर्चा केली.
चैनसुख संचेती (Chainsukh Sancheti) म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीत (Buldhana Assembly) मलकापूर विधानसभा मतदार संघात आपल्याविषयी अनेक खोटे अपप्रचार करण्यात आले. यांनी 25 वर्षात काहीच केले नाही, असा भ्रम मतदारांमध्ये पसरविण्यात आला. मात्र आपण दिखाऊ विकासापेक्षा शाश्वत विकासाला कायम प्राधान्य दिले. शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न जिगाव प्रकल्पाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून त्या कामाला मार्गी लावले, (PM Sadak Yojana) प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत मतदार संघातील अनेक रस्त्यांच्या कामांना पूर्णत्वास नेले. अनेक प्रशासकीय इमारती मलकापूर मलकापूर व नांदुरामध्ये उभ्या झाल्या.
जनतेच्या सुखदुःखात सामील होणारा आमदार, म्हणून जिल्ह्यात आपण सर्वात पुढे राहलो. परंतु या कामांचा व गोष्टींचा आपण कधी प्रचार केला नाही, फक्त प्रामाणिकपणे काम करत राहण्याला प्राधान्य दिले. सतत पाच वेळा आमदार असल्यामुळे अँटीइन्कबंसीचाही मागच्या वेळेस फटका बसला. आता मात्र जनतेला कळून चुकले आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत खोट्या अपप्रचाराला मतदार बळी पडणार नसल्याचेही ते म्हणाले. मलकापूर अर्बन बँक ही नफ्यात चालणारी संस्था असून, केवळ रिझर्व बँकेच्या निर्बंधामुळे काही आर्थिक अडचणी आल्याचे त्यांनी नमूद करून ठेवीदारांच्या ठेवी पूर्णतः सुरक्षित असल्याचे (Chainsukh Sancheti) चैनसुख संचेती यांनी यावेळी स्पष्ट केले.