गंगाखेड उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांचे आवाहन
परभणी/गंगाखेड (Assembly Elections) : आगामी (Assembly Elections) विधानसभा निवडणुकीसाठी ९७ गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या नव मतदारांनी विशेष मोहिमेत सहभागी होवून मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करुन घ्यावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर (Jeevraj Dapkar) यांनी आज आयोजीत केलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत व पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.
आगामी (Assembly Elections) विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन मतदारांची अधिकाअधिक नोंदणी व्हावी या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने दि. १ जुलै या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत दि. २५ जुन ते दि. २४ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) यांच्याव्दारे घरोघरी भेटी देवून त्यांच्या मतदार यादी भागातील मतदारांची पडताळणी करत याच कालावधीमध्ये नव मतदारांची नाव नोंदणी केली जाणार असून मतदार यादीतील दुबार नावांसह मयत मतदारांची नांवे खात्री करुन वगळली जाणार आहेत. मतदार यादीमधील मतदारांचे फोटो योग्य त्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन अदयावत केले जाणार असून या शिवाय मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, प्रमाणीकरण व तपासणी देखील करण्यात येणार आहे.
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी दि. २५ जुलै रोजी प्रसिध्द करून दि. २५ जुलै ते दि. ९ ऑगस्ट या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जाणार असून शनिवार व रविवार रोजी दावे व हरकती स्विकारण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दि. १९ ऑगस्ट पर्यंत राहणार असून २० ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाणार असल्याने दि. २८ जून रोजी गंगाखेड उपविभागातंर्गत तहसील कार्यालयात तालूक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांची बैठक घेत तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांना मार्गदर्शन करून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली.
त्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत दि. १ जुलै या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती पत्रकार व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. या (Assembly Elections) मोहिमेत दि. १ जुलै रोजी वयाची १८ वर्षे पुर्ण करणाऱ्या नव मतदारांसह मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पात्र असलेल्या अन्य नागरिकांची मतदार म्हणून मतदार यादीत नांवे नोंदवावी. या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नांवे नोंदणी न झालेल्या सर्व नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नांव मतदार म्हणून नोंदविता येणार असल्याने राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदान केंद्र (बीएलओ) स्तरावर एजंटाची नेमणूक करावी अशा सूचना राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना देत ९७ गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नव मतदार व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होवून मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर (Jeevraj Dapkar) यांनी केले आहे.