हिंगोली (Yogesh Kumar Meena) : सन २०२४ च्या तुकडीतील परिविक्षाधीन भारतीय प्रशासन सेवेतील ८ अधिकार्यांचे लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरी येथील फेझ – १ चे प्रशिक्षण १८ एप्रिल रोजी संपुष्टात आले. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील जिल्हा प्रशिक्षणाकरीता राज्यशासनाकडे रुजू झाले.
त्यामुळे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्यांना पुढील जिल्हा प्रशिक्षणासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी जिल्ह्यात पदस्थापना देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मिना (Yogesh Kumar Meena) यांची नियुक्ती केली आहे. ९ जूनला ते रुजू झाले असुन जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात रोटेशन पध्दतीनूसार कामकाज हाताळणी करणार आहेत. त्यांचा हिंगोली जिल्ह्यात सन 2026 पर्यंत कार्यकाळ राहणार आहे.




