विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी अंनिसचा फिरता तारांगण उपक्रम
घोट (Astronomy Education) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गडचिरोली शाखा घोटच्या वतीने जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात वैज्ञानिक दृष्टिकोन हा विद्यार्थ्यांना शिकवून त्यांच्यात रुजवण्यासाठी दहा गाभाभूत घटकांमध्ये अंतर्भूत केलेला महत्त्वाचा घटक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्याची रुजवणूक व्हावी प्रसंगी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या ३६ वर्षापासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये जाऊन आकाशातील ग्रहतारे यांच्या विषयी फिरत्या तारांगणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये त्याची जाणीव जागृती करून देत असतात.
सध्या 19 जानेवारी २०२६ पासून गडचिरोली जिल्ह्यात फिरते नभांगण आले असून जिल्ह्यातही अनेक शाळांमध्ये जाऊन आकाशातील ग्रहमाला तारांगण दाखवणे सुरू आहे.याचा प्रत्यय घोट येथील पी.एम.श्री. जवाहर नवोदय विघालयाच्या सभागृहात जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य ममता लांजेवार यांनी सभागृह उपलब्ध करून दिल्याने घोट येथील शाळांमधील विद्यार्थ्यांनी फिरत्या नभांगन व तारांगणाचा आनंद लुटला. यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय घोट,जिल्हा परिषद महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय,परम पुज्य कॉन्व्हेंट स्कूल, नवोदय विद्यालय हायस्कूल,परम पूज्य महात्मा गांधी हायस्कूल या सर्व घोट येथील शाळेतील जवळपास 700 विद्यार्थ्यांनी आकाशातील ग्रहमाला तारांगण अगदी जवळून बघितले.
फिरत्या तारांगणातून विद्यार्थ्यांना ग्रह-ताऱ्यांचे ज्ञान
प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचे आनंद दिसून आले. याप्रसंगी मैत्री आकाशातील ग्रह ताऱ्यांशी ही पन्नास रुपये किमतीची पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याला भेट देण्यात आली. याप्रसंगी जवाहर नवोदय विद्यालयाचे उपप्राचार्य राजन गजभिये यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी परमपूज्य महात्मा गांधी हायस्कूलचे प्राचार्य मनोज नागोसे, घोट आणि शाखेचे कार्याध्यक्ष आसिफ सय्यद,उपाध्यक्ष प्रा सी के कांबळे,घोट शाखेचे अध्यक्ष दिनकर लाकडे,अ अर्थराम मैत्री,पत्रकार हेमंत उपाध्ये,भास्कर सदाकडे, संजय कांबळे,केतन काबंळे,निशांत कसबे, शिवराम मोगरकर, रंजीत खेडकर व सहभागी विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




